शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

कबुतरासाठी पक्षिप्रेमींनी लावली जिवाची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2020 6:00 AM

चंदननगर चौकातील हायमास्ट दिव्याच्या खांबावर नायलॉन मांजामध्ये कबुतर अडकले होते. तेथून ये-जा करणारे नागरिक कबुतराला पाहत होते. मात्र, त्याच्याकरिता ते काहीही करू शकत नव्हते. अखेर या घटनेची माहिती सायंकाळी एका पक्षिप्रेमी तरुणीने सर्पमित्र अविनाश येते यांना दिली. त्यांनी वसा संस्थेच्या हेल्पलाइनवर संपर्क साधला.

ठळक मुद्देसंडे अँकर । हायमास्ट खांबावरील मांजातून सुखरूप काढले, साईनगरवासीयांनी अनुभवला रेस्क्यूचा थरार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अकोली रोडवरील चंदननगर येथे विजेच्या खांबावरील नायलॉन मांजात अडकलेल्या कबुतराला पक्षिप्रेमींनी जिवाची पर्वा न करता वाचविले. वसा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अग्निशमन विभागाच्या मदतीने शुक्रवारी सायंकाळी हायमास्ट दिव्याच्या खांबावरून कबूतरला मांजातून सुखरूप बाहेर काढले.चंदननगर चौकातील हायमास्ट दिव्याच्या खांबावर नायलॉन मांजामध्ये कबुतर अडकले होते. तेथून ये-जा करणारे नागरिक कबुतराला पाहत होते. मात्र, त्याच्याकरिता ते काहीही करू शकत नव्हते. अखेर या घटनेची माहिती सायंकाळी एका पक्षिप्रेमी तरुणीने सर्पमित्र अविनाश येते यांना दिली. त्यांनी वसा संस्थेच्या हेल्पलाइनवर संपर्क साधला. या माहितीवरून अ‍ॅनिमल्स रेस्क्यूअर भूषण सायंके, निखिल फुटाणे, सहायक पशुचिकित्सक गणेश अकर्ते आणि शुभम सायंके हे सर्र्व साहित्य घेऊन चंदननगरात पोहोचले. तेथे मदतीसाठी नागरिक मंगेश सेवतकर आणि प्रशांत जाधव धावून आले.रात्रीच्या अंधारात वीजप्रवाह सुरू असलेल्या विजेच्या खांबावर चढणे धोकादायक होते. त्यातच कबुतर प्रखर प्रकाश देणाºया हायमास्ट दिव्याच्या वरच्या बाजूला उलटे लटकून होते. त्याला वाचविणेही कठीण होते. त्यामुळे सहायक पशुचिकित्सक गणेश अकर्ते यांच्या मदतीने शुभम सायंके यांनी अग्निशमन दलाच्या जवानांना मदतीसाठी बोलाविले. अग्निशमनच्या मदतीने पक्ष्याचे रेस्क्यू करण्याचे ठरले. मात्र, लावलेली शिडी आखूड होती. त्यातच तेथे बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. अखेर भूषण सायंके यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता सेल्फ हँगिंग मेथडचा उपयोग घेऊन मांजात अडकलेल्या कबुरतराला सोडविण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यांना निखिल फुटाणे, गणेश अकर्ते आणि अग्निशमन दलाचे जवान यांनी खालून आधार दिला. त्यानंतर भूषणने एका दोरावर लटकून मांजा कापला आणि कबुतरला मुक्त केले. उपचारानंतर त्या कबुतराला रेस्क्यू केलेल्या ठिकाणा नजीक मुक्त करण्यात येणार असल्याची माहिती वसाचे शुभम सायंके यांनी दिली.नायलॉन मांजाचा वापर न करण्याचे आवाहन यानिमित्त वसा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.११ पक्षी पतंगीच्या मांजात अडकल्याची नोंदडिसेंबर आणि जानेवारीत वसा रेस्क्यू टीम मांजात अडकलेल्या पक्ष्यांची आणि मांजाने जखमी झालेल्या पक्ष्याच्या नोंदी घेतल्या आहेत. प्रामुख्याने शिकारी पक्षी घुबड आणि त्यानंतर मिश्रहारी पक्षी कबुतर, हरियल, स्थानिक स्थलांतरित पक्षी उघडचोच करकोचा यांना नायलॉन मांजाचा चांगलाच फटका बसल्याची माहिती वसाचे गणेश अकर्ते यांनी दिली.

टॅग्स :kiteपतंग