शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

बापमाणूस! पोटच्या गोळ्याला वाचविण्यासाठी पित्याची ७० फूट खोल विहिरीत उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 21:54 IST

Father Save Son : मोठ्या भावासोबत खेळताना मुलगा विहिरीत पडल्याचे कळताच वडिलांनी क्षणाचाही विलंब न लावता ६० ते ७० फूट खोल विहीरीत उडी घेतली.

अमरावती - मोठ्या भावासोबत खेळताना  साडेचार वर्षाचा मुलगा अचानक अपार्टमेंटमधील विहिरीत कोसळला. ही माहिती कानी पडताच क्षणाचाही विलंब न करता ७० फूट खोल विहिरीत उडी घेतली. या दोघांनाही महापालिकेच्या रेस्क्यू टीमने बाहेर काढले. दैव बलवत्तर म्हणून खोल पाण्यात या बाप-लेकांनी तग धरला. (Father's jump into a 70 feet deep well to save the Son )

 मनीष सोपानराव मानकर (३८, रा. अभिनव कॉलनी) असे जिवाची बाजी लावणाऱ्या वडिलांचे, तर मनस्व असे जीवदान मिळालेल्या मुलाचे नाव आहे. ही घटना शेगाव नाकानजीक अभिनव कॉलनीतील साईतिर्थ अपार्टमेंटमध्ये शनिवारी सांयकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.  मनस्व विहिरीत पडल्याची माहिती त्याचा  मोठा भाऊ आर्यनने वडिलांना दिली. त्यानंतर वडिलांनी क्षणाचाही विलंब न लावता ६० ते ७० फूट खोल विहीरीत उडी घेतली. आधी त्यांना मनस्व दिसून आला नाही. मात्र त्यांनी पाण्यात पुन्हा बुडी घेतल्यानंतर मनस्वचा पाय त्यांच्या हातात लागला. त्यांनी मनस्वला जवळ घेतले आणि कपारीचा आधार घेत पाण्यावर आले. तोपर्यंत विहिरीजवळ अपार्टमेंटमधील  नागरिकांनी गर्दी केली होती. विहिरीत वडील व मुलगा जीवंत आहे किवा नाही, हे कुणालाही कळत नव्हते. दरम्यान, भ्रमध्वनीवरून माोरे नामक व्यक्तीने महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या रेस्क्यू टीमला माहिती दिली. त्यांनीही दोन किंमीचे अंतर पाच मिनिटात गाठले. विहिरीत दोरीची शिडी सोडून एका जवानाने त्यावरून उतरून मनस्वला काठावर आणले. त्यानंतर मनीष मानकर हे शिर्डीच्या आधाराने विहिरीबाहेर आले. मुलाला जवळच्या फॅमिली डॉक्टरकडे उपचाराकरिता नेण्यात आले होते. दोघांना वाचविणाऱ्या रेस्क्यू टीममध्ये अभिषेक निंभोरकर, सूरज लोणारे, अमोल साळुंखे, हर्षद दहातोंडे, जयकुमार वानखडे, शुभम जाधव यांचा समावेश होता.

आणि आकांत शमला

मनस्व ७० फूट खोल विहिरीत कोसळल्याचे कळताच त्याच्या आईचा आकांत पराकोटीला गेला होता त्याचे वाईट होऊ नये, तो सुखरूप असावा, यासाठी प्रत्येक देवाचा धावा करीत होती. मनस्व सुखरूप परतल्यानंतर पटापट पापे घेत माऊलीने त्याला मिठीत घेतले.

टॅग्स :AmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्रFamilyपरिवार