वडिलांवर विळ्याने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:09 IST2021-07-05T04:09:52+5:302021-07-05T04:09:52+5:30

अमरावती : मद्यपी मुलाने वडिलांवर विळ्याने हल्ला केल्याची घटना शनिवारी बडनेरा ठाण्याच्या हद्दीतील अंजनगाव बारीत घडली. वीरेंद्र शिवनाथसिंह पुने ...

The father was attacked with a machete | वडिलांवर विळ्याने हल्ला

वडिलांवर विळ्याने हल्ला

अमरावती : मद्यपी मुलाने वडिलांवर विळ्याने हल्ला केल्याची घटना शनिवारी बडनेरा ठाण्याच्या हद्दीतील अंजनगाव बारीत घडली. वीरेंद्र शिवनाथसिंह पुने (४६, रा. नेहरू चौक, अंजनगाव बारी) यांच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी जितेंद्र शिवनाथसिंह पुने (४०) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.

------------------------------------------

घरात शिरून सेन्ट्रिंगच्या बल्लीने मारहाण

अमरावती : जुन्या वादातून एका इसमाला घरातून घुसून सेन्ट्रिंगच्या बल्लीने मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवारी आदिवासीनगरात घडली. शशिकांत बकाराम आत्राम (४५, रा. आदिवासी कॉलनी) यांच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी अभी नावाचा इसम आणि नीलेश वाढवे (रा. श्यामनगर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.

-------------------------------------------

कुरेशीनगरातून दुचाकी लंपास

अंजनगाव सुर्जी : कुरेशीनगरातून एका तरुणाची दुचाकी चोराने लंपास केली. ही घटना शनिवारी उघडकीस आली. मोहम्मद जुबेर वल्द अब्दुल शाहीद (२२ रा. कुरेशीनगर) यांनी एमएच २७ बीए ०८०५ या क्रमांकाची दुचाकी घरासमोर उभी केली होती. दुसऱ्या दिवशी त्यांना ती दुचाकी दिसली नाही. त्यांच्या तक्रारीवरून अंजनगाव पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला.

Web Title: The father was attacked with a machete