रेती तस्करांचा महसूल कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 05:00 IST2021-04-22T05:00:00+5:302021-04-22T05:00:52+5:30

सूत्रांनुसार, तलाठी चेतन चकोले गंभीर जखमी झाले आहेत. योगेश बुराळ, रमेश मारग, केवलसिंह गोलवाल, कोतवाल नागेश कनाठे हे किरकोळ जखमी झाले. शिवा शिवहरे, योगेश गुल्हाने, सुरेंद्र भुयार, सचिन थोटे, आशिष शेळके, महेंद्र चौधरी (सर्व रा . राजुराबाजार) व सहा अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. बुधवारी पहाटे साडेतीन वाजता देऊतवाडा रेतीघाटावर हे चार कर्मचारी एमएच ३४ बीडब्ल्यू ९४४१ व एमएच २७ सीक्यू ९०९४  क्रमांकाच्या दुचाकींनी गेले होते.

Fatal attack on a revenue employee by sand smugglers | रेती तस्करांचा महसूल कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला

रेती तस्करांचा महसूल कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला

ठळक मुद्देदेऊतवाडा येथील घटना, दोन दुचाकींची तोडफोड, १२ पसार आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड : तालुक्यात देऊतवाडा येथे महसूलच्या गस्ती पथकावर रेती तस्करांनी बुधवारी पहाटे साडेतीन वाजता जीवघेणा हल्ला केला. यात एक तलाठी गंभीर जखमी, तर चार जण किरकोळ जखमी झाले. या प्रकरणात पोलिसांनी १२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. पसार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. 
सूत्रांनुसार, तलाठी चेतन चकोले गंभीर जखमी झाले आहेत. योगेश बुराळ, रमेश मारग, केवलसिंह गोलवाल, कोतवाल नागेश कनाठे हे किरकोळ जखमी झाले. शिवा शिवहरे, योगेश गुल्हाने, सुरेंद्र भुयार, सचिन थोटे, आशिष शेळके, महेंद्र चौधरी (सर्व रा . राजुराबाजार) व सहा अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. बुधवारी पहाटे साडेतीन वाजता देऊतवाडा रेतीघाटावर हे चार कर्मचारी एमएच ३४ बीडब्ल्यू ९४४१ व एमएच २७ सीक्यू ९०९४  क्रमांकाच्या दुचाकींनी गेले होते. रेती तस्करांनी धारदार वस्तूंनी त्यांच्यावर हल्ला केला व  दोन्ही दुचाकींची तोडफोड केली. 
चेतन चकोले यांचे डोक्यावर गंभीर दुखापत होऊन नऊ टाके पडले. सर्व जखमींना तहसीलदार किशोर गावंडे, नायब तहसीलदार प्रतिभा चौधरी यांनी पहाटेच ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तलाठी केवलसिंह गोलवाल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंविचे कलम ३५३ , ३०७ , ३४ , १४३ ,१४७ , १४८ अन्वये गुन्हा दाखल केला. ठाणेदार प्रदीप चौगावकर यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक हेमंत चौधरी, उपनिरीक्षक हिवसेंसह वरूड पोलीस पथक आरोपींचा शोध  घेत आहे.

महसूल कर्मचारी, पटवारी संघटनेचा निषेध 
उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांनी रुग्णालयात जखमींची चौकशी केली व कठोर कारवाईच्या सूचना पोलिसांना केल्या. महसूल कर्मचारी, पटवारी संघटनेचे अध्यक्ष प्रमोद राऊत व सदस्यांनी मारहाणीचा निषेध करून कठोर कारवाईची मागणी केली. 

 

Web Title: Fatal attack on a revenue employee by sand smugglers

टॅग्स :sandवाळू