शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

घोेरपडींची विक्री रोखणाऱ्या पथकावर जीवघेणा हल्ला; एक जण जखमी, आरोपी ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 00:24 IST

वडाळी परिसरात पावसाळ्याच्या प्रारंभी घोरपडींची विक्री पारधी समूहाकडून केली जाते. ती याच मोसमात खाण्यासाठी खरेदी केली जात असल्याचे निरीक्षण हेल्प फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी नोंदविले आहे.

मनीष तसरे -अमरावती : शहरातील वडाळी परिसरात घोरपडींची राजरोस विक्री रोखण्यासाठी गेलेल्या वनविभाग व पोलिसांच्या पथकावर समूहाकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला. तो परतवून लावत चार घोरपडी जप्त करण्यात आल्या तसेच एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास हा थरारक घटनाक्रम घडला.

वडाळी परिसरात पावसाळ्याच्या प्रारंभी घोरपडींची विक्री पारधी समूहाकडून केली जाते. ती याच मोसमात खाण्यासाठी खरेदी केली जात असल्याचे निरीक्षण हेल्प फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी नोंदविले आहे. या अवैध खरेदी-विक्रीच्या मुळाशी जाण्यासाठी त्यांनी पाळतदेखील ठेवली. मंगळवारी येथील पारडी बेड्यावरील काही घरांमधून विक्रीसाठी घोरपडी आणल्या गेल्याची माहिती संस्थेचे सदस्य शुभम गायकवाड, सुमीत गवई, सोनाली नवले व अभय मेटांगे यांनी मंगळवारी दुपारी वनविभागाला दिली.सायंकाळच्या सुमारास वनविभागाने फ्रेजरपुरा पोलिसांचे सहकार्य घेत पारधी बेेड्यावर धाड टाकली. येथील एका घरातून चार घोरपडी जप्त करण्यात आल्या. त्यामुळे बिथरलेल्या पारधी समूहाकडून पथकावर सशस्त्र हल्ला चढविण्यात आला. पावशीसारख्या शस्त्राचा यामध्ये वापर करण्यात आला.यात योगेश सूर्यकांत धंदर व सागर सखाराम हागे हे जखमी झाले. वनविभागाच्या ताफ्यातील दुचाकीचेदेखील जमावाने नुकसान केले. आकस्मिक हल्ल्याने सैरभैर झालेल्या वनविभाग व पोलिसांच्या पथकाने सावरून पुन्हा कारवाईला प्रारंभ केला. घोरपडीची अवैध विक्री करणाऱ्या एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून दुसरा पळून गेल्याची माहिती आहे. पुढील कार्यवाही वनविभाग करीत आहे.वनविभागाच्या सहायक वनसंरक्षक ज्योती पवार यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा हरणे, वनपाल श्याम देशमुख, राहुल चव्हाण, प्रशांत खाडे, चंद्रकांत चोले, सुनील टोकले, फिरोज खान, अन्सार दर्गीवाले, हेमंत पांगरे, दिनेश धारपवार, विद्या बनसोड, अश्विनी जाधव, संदीप चौधरी यांच्यासह फ्रेजरपुरा पोलिसांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला.वडाळी परिसर पारधीपुरा येथे घोरपडी विकण्यात येत असल्याची माहिती हेल्प फाउंडेशनच्या सदस्यांनी दिली होती. त्यानुसार सायंकाळी पथकासह कार्यवाही करण्याकरीता गेलो असता, जमावाने हल्ला केला. यात दोन कर्मचारी जखमी झाले दुचाकीचे नुकसान झाले. या ठिकाणावरून चार घोरपडी जप्त करण्यात आल्या. एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले. - वर्षा हरणे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वडाळीपावसाळा हा घोरपडींसाठी विणीचा हंगाम असतो. घोरपडी गर्भवती असतात. याच काळात त्यांना खाण्याचे प्रचलन आहे. अनेक अंधश्रद्धांमुळे त्यांचा नाहक बळी जात आहे. त्यांची संख्या ही दिवसेंदिवस घटत चालली आहे.- सुमीत गवई, सचिव, हेल्प फाउंडेशन

टॅग्स :AmravatiअमरावतीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी