शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Amravati | ओव्हरटेकच्या नादात ट्रकने दोन विद्यार्थांना उडविले, एक गंभीर जखमी

By गणेश वासनिक | Updated: September 24, 2022 17:13 IST

श्री गुरुदेव आयुर्वेद रुग्णालयाजवळ घडली घटना

तिवसा (अमरावती) :अमरावतीवरून नागपूरकडे समांतर वेगाने चालणाऱ्या दोन वाहनांपैकी ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रकने (एम एच ०४-एच.डी.९०५६) महामार्गालगत असलेल्या किराणा दुकानाला जबर धडक दिली. यावेळी लागूनच असलेल्या श्री गुरुदेव आयुर्वेद रुग्णालयातून कर्तव्य बजावून निघालेल्या व श्री गुरुदेव आयुर्वेद महाविद्यालयात तृतीय वर्षाला शिकणाऱ्या  दुचाकीवर स्वार असलेल्या दोन विद्यार्थ्यांना ट्रकने चिरडल्याची घटना शनिवारी दुपारी बारा वाजता दरम्यान गुरूदेव नगर येथे महामार्गावर घडली.

प्राप्त माहितीनुसार महामार्गावर असलेल्या व्यापारी संकुलात सागर डेहणकर यांचे किराणा दुकान आहे. तसेच महासमाधीपासुन शंभर मीटरपर्यंत महामार्गाचे चौपदरीकरण झालेले नाही. त्यामुळे रहदारीने अतिशय गजबजलेल्या व अरुंद रस्त्यावरून नियमित भरधाव वाहतूक सुरू असते. अशातच अमरावतीवरुन नागपूरकडे जाणाऱ्या ट्रकने किराणा दुकानाला जबर धडक दिली. सुदैवाने दुकानाचे कोणतेही नुकसान झाले नाही. परंतु त्याचवेळी येथील श्री गुरुदेव आयुर्वेद महाविद्यालयात तृतीय वर्षाला शिकणाऱ्या व दुचाकीवर (एम.एच.३६-पी-४०७१) निघालेल्या भावेश नंदू जगनाळे (२१) रा. लाखनी जि. भंडारा व वैष्णवी सुधीर नार्लेवार( २१) रा. गोंडपिंपरी जि.चंद्रपुर या दोन विद्यार्थ्यांची दुचाकी ट्रकखाली आली. त्यामुळे भावेश जगनाळे हा गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ उपचारार्थ अमरावती येथे पाठविण्यात आले. तर वैष्णवी नार्लेवार या विद्यार्थीनीवर येथील आयुर्वेद रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यावेळी दुचाकीसह ट्रकखाली अडकलेल्या विद्यार्थ्याला बाहेर काढण्यासाठी स्थानिक युवकांनी शर्थीचे प्रयत्न करून पोलिसांना सहकार्य केले.

घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. तसेच ट्रकचालक बाळू राजेंद्र काळे (२६) रा. बेलपुरा अमरावती याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.दोन महिन्यांत चौथा अपघात

महामार्गावरील हे ठिकाण अपघातांचे प्रणव स्थळ झाले आहे.कारण येथे पादचारी रस्ताच नाही. व महामार्गालगत व्यावसायिक प्रतिष्ठाने आहेत.तसेच याच मार्गावर आयुर्वेद रुग्णालय व शाळा महाविद्यालय असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांची नेहमीच वर्दळ असते.अशावेळी भरधाव येणाऱ्या वाहनांपासुन नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागते.त्यामुळे आबालवृद्धांसह विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.येथील महामार्गावर व्यवसाय थाटलेल्या व्यावसायिकांना पार्किंगचे अजीबात भान नाही.त्यामुळे महामार्गावर अस्ताव्यस्त अवैध पार्किंग हा नित्याचाच विषय झाला आहे.काही हाॅटेल व्यावसायिकांनी तर गेल्या कित्येक वर्षांपासून चक्क महामार्गच पार्कींगसाठी वापरात घेतला आहे.परंतु एवढ्या गंभीर समस्येकडे पोलिस प्रशासन व महामार्ग निर्माण आय.आर.बी.कंपनीचे अक्षम्य दुर्लक्ष असल्यामुळे भविष्यात येथे गंभीर अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.महामार्गावर असलेल्या व्यापारी संकुलाची जागा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हस्तांतरित केली असून संबंधितांना त्याचा मोबदला सुद्धा देण्यात आला आहे.परंतु व्यावसायिक त्याच जागेवर ठाण मांडून बसल्यामुळे रस्ता रुंदीकरण करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे.जोपर्यंत येथील व्यापारी संकुले मोकळी करून पादचारी मार्ग तयार होत नाही तोपर्यंत अपघातांची श्रृंखला अशीच चालणार काय? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

टॅग्स :AccidentअपघातStudentविद्यार्थीAmravatiअमरावती