शेतकरी अस्थिकलश दर्शन यात्रा...
By Admin | Updated: May 11, 2017 00:11 IST2017-05-11T00:11:27+5:302017-05-11T00:11:27+5:30
शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे राज्यात ठिकठिकाणी शेतकरी आत्महत्या करीत आहेत.

शेतकरी अस्थिकलश दर्शन यात्रा...
शेतकरी अस्थिकलश दर्शन यात्रा... शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे राज्यात ठिकठिकाणी शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील साखराळे येथील विजय जाधव नामक शेतकऱ्याने शेतकरी अस्थिकलश दर्शन यात्रा प्रारंभ केली आहे. कोल्हापूर ते नागपूर व मुंबई अशा या यात्रेदरम्यान ते प्रत्येक जिल्ह्यात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या अस्थी गोळा करीत आहेत. दुचाकीने त्यांचा हा प्रवास सुरू आहे. अमरावती जिल्ह्यातील वाघोली येथील शीतल व्यंकट वायाळ नामक शेतकऱ्याच्या अस्थी त्यांनी घेतल्या.