शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 06:00 IST2019-12-18T06:00:00+5:302019-12-18T06:00:34+5:30

एसएओ कार्यालयातील घटना लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : निकृष्ट दर्जाचे सोयाबीन बियाणे शेतात न उगवल्याने मोठे नुकसान झाले. याउलट ...

Farmer's suicide attempt | शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

ठळक मुद्देवांझोट्या सोयाबीनचा अहवाल चुकीचा : कृषी अधिकाºयाची बेपर्वाई; प्रहारचा आरोप

एसएओ कार्यालयातील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : निकृष्ट दर्जाचे सोयाबीन बियाणे शेतात न उगवल्याने मोठे नुकसान झाले. याउलट कृषी अधिकाऱ्यांनी अहवाल चुकीचे दिल्याचा आरोप करीत संतप्त शेतकºयाने मंगळवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात (एसएओ) आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या सावधगिरीमुळे अनर्थ टळला.
मनीष कडू असे या अन्यायग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. ते मोर्शी तालुक्यातील तुळजापूर येथील रहिवासी आहेत. त्यांच्याकडे दोन एकर स्वत:चे, तर दीड एकर वडिलांच्या नावे शेत आहे. यावर्षी मनीष कडू यांनी विक्रांत-३२ नामक कंपनीचे सोयाबीन बियाणे शेतात पेरले होते. ते उगवले नाही. त्यांनी या प्रकरणाची तक्रार कृषी विभागाकडे केली. उपविभागीय कृषी अधिकारी राहुल सातपुते यांच्या सूचनेवरून तालुका समितीचे सचिव व मोर्शी पंचायत समितीचे कृषी अधिकारी सुरेश औंधकर यांनी यांनी कडू यांच्या शेतातील पिकांची पाहणी करण्यात आली. पंचायत समितीने याप्रकरणी दिलेला अहवाल मात्र तक्रारीच्या विरोधात असल्याचा कडू यांचा आरोप आहे.
मनीष कडू यांच्यावर स्टेट बँकेचे दीड लाख रुपयांचे कर्ज आहे. हलाखीची परिस्थिती व त्यात नापिकी यामुळे ते प्रचंड निराश झाले. कृषी विभागाने आपणास आर्थिक मदत करावी, अशी त्यांनी मागणी केली. मात्र, पंचायत समिती व कृषी विभागाच्या अधिकाºयांनी याकडे दुर्लक्ष केल्याने संतापलेल्या कडू यांनी १७ तारखेला आत्मदहनाचा इशारा दिला होता.
दरम्यान, प्रहारने याच प्रकरणात मंगळवारी एसएओ कार्यलयात आंदोलन केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी सदर प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून मनीष कडू यांना आर्थिक मदत मिळवून देणार असल्याचे आंदोलकांना सांगितले. याविषयी दोन अधिकाºयांविरोधात कारवाईचे पत्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी व विभागीय कृषी सहसंचालक यांना मंगळवारी पाठविल्याचे चवाळे यांनी सांगितले.

दोन अधिकाऱ्यांविरोधात कारवाईचा प्रस्ताव
कृषी विभागाने शेतकऱ्यांप्रति संवेदनशील असणे महत्त्वाचे आहे. याप्रकरणी तालुका समितीचा अहवाल संदिग्ध आहे. बियाणे सदोष आहे, असे म्हणता आले असते. मात्र, निष्काळजीपणा झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्याने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी तालुका समितीचे सचिव सुरेश औंधकर यांच्यावर कारवाईसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी व उपविभागीय कृषी अधिकारी सातपुते यांच्यावरील कारवाईसाठी विभागीय कृषी उपसंचालकांकडे प्रस्ताव पाठविला आहे.

प्रहारचे आंदोलन अन् कडू यांची एंट्री
प्रहारच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते. प्रहारचे शहराध्यक्ष चंदू खेडकर व विदर्भप्रमुख छोटू महाराज वसू यांच्या नेतृत्वात अनेक कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले. हे आंदोलन सुरू असताना याच वेळी मनीष कडू दुचाकीवरून उतरले. त्यांच्या हातामध्ये रॉकेलने भरलेली बॉटल होती. कडू यांनी उपविभागीय कृषी अधिकारी राहुल सातपुते व प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. उपस्थित पोलिस अधिकारी व नागरिकांनी मनीष कडू यांंचा हेतु लक्षात येताच त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न हाणून पाडला.

शेतकºयाच्या तक्रारीनंतर तीन आठवड्यांनी पाहणी, खातरजमा न करता अन्य कारणे दर्शविण्यात आल्याचे अहवालात दिसून आले. त्यामुळे दोन अधिकाºयांविरोधात कारवाईचा प्रस्ताव पाठविला आहे.
- विजय चवाळे
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

Web Title: Farmer's suicide attempt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी