शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
5
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
6
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
7
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
8
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
9
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
10
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
11
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
12
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
13
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
14
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
15
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
16
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
17
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
18
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
19
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
20
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल

माकडांचा हैदोस रोखण्यासाठी ‘कार्बाइड’ बंदूक; नव्या जुगाडाला शेतकऱ्यांची पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2020 6:51 PM

माकडांचा हैदोस रोखण्यासाठी आयडियाची कल्पना

अमरावती: सततच्या नैसर्गिक आपत्तीने पुरता खचलेला शेतकरी वन्यप्राण्यांच्या हैदोसाने हतबल झाला आहे. त्यावर उपाय म्हणून वैज्ञानिक प्रयोग व तंत्रज्ञानाचे ‘जुगाड’ याच्या परिणामी पीव्हीसी पाइपपासून कार्बाइड बंदूक तयार करण्यात आली. त्याची विक्री ग्रामीण भागात केली जात आहे. 

वस्ती असो की शिवार, वन्यप्राणी आणि वानरांचा उच्छाद रोजचाच. गुरुदेवनगर, मोझरीचे रहिवासी या त्रासाने कमालीचे हैराण झाले आहेत. माकडे गावात येऊन अन्नधान्याची कमालीची नासाडी करतात. यावर उपाय म्हणून गोफण, गुल्लेर, रसायनमिश्रित गोळे, फटाक्यांसोबत आता भर पडली ती कार्बाइड बंदुकीची. अतिशय कमी खर्चात तयार करता येणाऱ्या बंदुकीतून स्ट्रोकचा मोठा आवाज वन्यप्राण्यांना हुसकावून लावण्यास पुरेसा आहे. या कार्बाइड बंदुकीचे अनेक विज्ञान प्रदर्शनात प्रात्याक्षिक करण्यात आले. शेतकऱ्यांची गरज ओळखून ती विकसित करण्यात आली. मागील आठवड्यात गुरुदेवनगरच्या आठवडी बाजारात चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेडचे रहिवासी जया व चंद्रकांत काकडे हे दाम्पत्य कार्बाइड बंदूक घेऊन आले. प्रत्येकी २०० रुपयांत ते बंदुकीची विक्री करतात. 

अशी आहे बंदूक पीव्हीसी पाईपच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या या बंदुकीत पुढच्या भागातून कॅल्शियम कार्बाइडचे खडे टाकण्यात येतात. त्यावर बंदुकीच्या वरच्या भागाला असलेल्या छिद्रातून थोडेसे पाणी टाकले जाते. कॅल्शिअम कार्बाइड व पाण्यामध्ये रासायनिक अभिसरण होऊन त्यातून सिटिलीन वायूची निर्मिती होते. सोबत जोडलेल्या गॅस लाइटरचे बटन दाबताच त्यातून जोरदार धमाकेदार आवाजाची निर्मिती होते. यातून कुठल्याही प्रकारची जीवितहानी अथवा प्रदूषण होत नाही, हे विशेष.