-तरीही आडतीचा भुर्दंड शेतकऱ्यांवरच

By Admin | Updated: December 22, 2014 22:38 IST2014-12-22T22:38:48+5:302014-12-22T22:38:48+5:30

कृषी उत्पन्न समितीच्या आवारातील शेतमाल खरेदी-विक्री व्यवहारातील आडत रद्द करण्याच्या पणन महासंघाच्या निर्णयामुळे बाजार समितीमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आली आहे.

On the farmer's land, | -तरीही आडतीचा भुर्दंड शेतकऱ्यांवरच

-तरीही आडतीचा भुर्दंड शेतकऱ्यांवरच

अमरावती : कृषी उत्पन्न समितीच्या आवारातील शेतमाल खरेदी-विक्री व्यवहारातील आडत रद्द करण्याच्या पणन महासंघाच्या निर्णयामुळे बाजार समितीमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आली आहे. सकृतदर्शनी हा निर्णय शेतकऱ्यांच्या बाजूने दिसत असला तरी आडतीचा भुर्दंड अन्य कुठल्या प्रकारात शेतकऱ्यांच्या माथी मारला जाणार आहे. अडत खरेदीदारांकडून वसूल केली जाणार असली तरी तेवढ्या रकमेचा फटका शेतमालाच्या दराला बसणार असल्याने हा भार शेतकऱ्यांनाच सोसावा लागणार आहे.
शेतमाल खरेदी विक्रीमधील आडत रद्द करुन शेतकऱ्यांनी बाजार समितीत कुठलीही आडत न देता थेट माल विक्री करण्याचे परिपत्रक शनिवारी काढले. त्यामुळे ६० वर्षांपासून प्रस्तावित अडत्यांची भूमिका आता बदलणार आहे.
यापूर्वी खरेदीदार हा आडत्यांचे कमिशन वजा करुन शेतमाल खरेदी करत असे. आता तो कमिशनएवढी रक्कम कमी करुन मालाची खरेदी करेल. त्यामुळे शेतमालाला जेवढी रक्कम यापूर्वी मिळत होती तेवढीच रक्कम त्याला यानंतरही मिळणार आहे.
व्यापाऱ्यांचा शिष्टमंडळ सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांना नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सोमवारी भेटल्यानंतर पणन संचालकांच्या आदेशाला त्यांनी स्थगिती दिली. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत प्रचलित पध्दतीनेच आडत कपात होणार आहे. मंगळवारपासून जिल्ह्यातील सर्व बाजार समितींमध्ये नियमित खरेदी विक्री व्यवहार राहणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: On the farmer's land,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.