शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे उपोषण, गुरेही आंदोलनस्थळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2017 00:14 IST

उर्ध्व वर्धा सिंचन मंडळाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या चांदूररेल्वे तालुक्यातील सोनगाव शिवणी प्रकल्पाचे पाणी पाझरून शेतकऱ्यांच्या शेतात साचत असल्याने प्रचंड हानी होत आहे.

पाझरामुळे शेतीचे नुकसान : जलसंपदाकडे भरपाईची मागणीअमरावती : उर्ध्व वर्धा सिंचन मंडळाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या चांदूररेल्वे तालुक्यातील सोनगाव शिवणी प्रकल्पाचे पाणी पाझरून शेतकऱ्यांच्या शेतात साचत असल्याने प्रचंड हानी होत आहे. नुकसान भरपाईच्या मागणीसाठी सोनगाव व कळमगांव येथील शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मात्र आंदोलनस्थळी बैलजोडीेही सोबत असल्याने हे आंदोलन चर्चेत आले आहे. नुकसान भरपाईची मागणी उपोषणकर्त्यांनी येथील जलसंपदा विभागाकडे केली आहे.तीन दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू आहे. यात काही जणांची प्रकृती खालावल्याने उपोषणकर्त्यांची वैद्यकीय तपासणी बुधवारी करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार, चांदूररेल्वे तालुक्यातील सोनगाव व कळमगावनजीक शिवणी प्रकल्प आहे. याप्रकल्पालगतच शेतकऱ्यांची शेती आहे. शेतात प्रकल्पाचे पाणी पाझरत असल्याने पावसाळ्यात दलदलसदृश्य स्थिती निर्माण होते. त्यामुळे गतवर्षी शेतकऱ्यांना नापिकीला सामोरे जावे लागले आहे. भविष्यातही या शेतीत उत्पन्नाची कोणतीही शाश्वती नसल्याने शेतकऱ्यांवर उपोषणाची वेळ आली आहे. खरीप व रबी पिकांची एकरकमी नुकसान भरपाई देण्यात यावी, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, पेरणीयोग्य नसलेली शेती अधिग्रहित करून तत्काळ मोबदला देण्यात यावा, आदी मागण्या उपोषणकर्त्यांच्या आहे. शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठांना यासंदर्भात अनेकदा निवेदन दिले आहे. परंतु दखल घेण्यात आली नाही. अखेर अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी उपोषण आरंभले. यामध्ये मनोहर वाघ, संध्या आसोले, संजट मेटे, दिनेश आमले, विजय सराड, प्रशांत वासनिक, अतुल मेटे, पुरूषोत्तम कांबळे, प्रशांत शिरभाते, प्रमोद शिरभाते उपस्थित आहे.