शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची जिल्हाकचेरीवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:21 IST

अमरावती: शेतकऱ्यांच्या विविध न्यायिक मागण्या तातडीने सोडविण्यात याव्यात अशी मागणी गुरुवार ४ फेब्रुवारी रोजी लढा संघटनेचे अध्यक्ष संजय देशमुख ...

अमरावती: शेतकऱ्यांच्या विविध न्यायिक मागण्या तातडीने सोडविण्यात याव्यात अशी मागणी गुरुवार ४ फेब्रुवारी रोजी लढा संघटनेचे अध्यक्ष संजय देशमुख यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनाव्दारे केली आहे.

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांना रात्रीचा वीजपुरवठा मिळत असल्याने अनेक शेतकरी सर्पदंश,वन्यप्राण्यांचा प्राणघातक हल्ला, विजेचा शाॅक अशा अनेक कारणाने मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा, शेतकऱ्यांना अस्मानी तसेच सुल्तानी आपत्तीचा सतत सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनेक वेळा शेती पिकलीच नाही आणि पिकली तर योग्य भावात शेतमाल विकल्या जात नाही.अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना येणारी संपूर्ण विजेची देयके माफ करण्यात यावी, केंद्र सरकारने लागू केलेले कृषी कायदे राज्य सरकारने लागू करू नये आदी मागण्या तातडीने साेडविण्याची मागणी लढा संघटनेने केली आहे. याबाबत त्वरित निर्णय न घेतल्यास मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीजवळ १५ फेब्रुवारीपासून शेतकऱ्यासह उपोषणाला बसण्याचा इशारा निवेदनात दिला आहे. यावेळी लढा संघटनेने अध्यक्ष संजय देशमुख, झेडपी सदस्या गौरी देशमुख,कांचन कारमोरे,तेजल कारमोरे,मुरली मदनकर,अरविंद केचे, प्रवीण केने,योगेश भुसारी,सुधीर वानखडे, जाकीर पठाण,रवींद्र तसरे,अमोल साबळे,विनोद धस्कट,दत्ता धस्कट,रोशन गवळी, पिंटू बेलसरे, मारोती निमकर,अभय लांजेवार,प्रवीण ठाकरे,दिनेश ठाकरे, प्रफुल्ल खारकर, अविनाश गोडबोले,भूषण खडतकर, अनिकेत माटे,धीरज खडतकर,अशोक पांडे,वैभव निंभोरकर आदी उपस्थित होते.