शेतकऱ्यांची दिवाळी यंदा अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 06:00 IST2019-10-26T06:00:00+5:302019-10-26T06:00:46+5:30

यंदा तालुक्यात मुबलक पाऊस बरसला. जिल्ह्यात अन्य १३ तालुक्यांच्या तुलनेत पावसाची टक्केवारी सरासरी १४० टक्क््यांवर पोहोचली. यामुळे रोखीचे पीक म्हणून ओळखले जाणारे कपाशी व सोयाबीन पीक चांगलेच बहरले होते. ९० दिवसांच्या कालावधीचे सोयाबीन पीक ऐन दिवाळी या महत्त्वाच्या सणाच्या वेळेस घरात येत असल्याने शेतकऱ्यांकडून या पिकाच्या लागवडीला प्राधान्य दिले जाते, तर कपाशीचा हंगाम मार्चपर्यंत लांबत असल्याने हे पीक शेतकऱ्यांकरीता पांढरे सोने म्हणून ओळखले जाते.

Farmers' Diwali in the dark this year | शेतकऱ्यांची दिवाळी यंदा अंधारात

शेतकऱ्यांची दिवाळी यंदा अंधारात

ठळक मुद्देसोयाबीन गेले : कपाशी वेचणी नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : मान्सूनचे चार महिने संपुष्टात आल्यानंतर ऑक्टोबरच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात कोसळलेल्या पावसाने हातातोंडाशी आलेले सोयाबीन मातीमोल झाले आहे. त्यामुळे शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या प्रकाशपर्व कसे साजरे करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. २५ ऑक्टोबरपासून दिवाळीला सुरुवात होत असताना, घरात ना सोयाबीन, ना कापूस; अशी शेतकऱ्याची झाली आहे.
यंदा तालुक्यात मुबलक पाऊस बरसला. जिल्ह्यात अन्य १३ तालुक्यांच्या तुलनेत पावसाची टक्केवारी सरासरी १४० टक्क््यांवर पोहोचली. यामुळे रोखीचे पीक म्हणून ओळखले जाणारे कपाशी व सोयाबीन पीक चांगलेच बहरले होते. ९० दिवसांच्या कालावधीचे सोयाबीन पीक ऐन दिवाळी या महत्त्वाच्या सणाच्या वेळेस घरात येत असल्याने शेतकऱ्यांकडून या पिकाच्या लागवडीला प्राधान्य दिले जाते, तर कपाशीचा हंगाम मार्चपर्यंत लांबत असल्याने हे पीक शेतकऱ्यांकरीता पांढरे सोने म्हणून ओळखले जाते. त्यावर शेतकऱ्यांचे वर्षभराचे पुढील पेरणीचे नियोजन ठरलेले असते. यामुळे शेतकरी वर्ग या दोन्ही पिकांना आपली पहिली पसंती देतो. मात्र, यावर्षी परतीचा पाऊस अधिक लांबल्याने सोयाबीन पीक घरी आणण्यासाठी कापणी झालेली असताना मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. परतीच्या पावसाने अचानक हजेरी लावल्याने शेतात कापून ठेवलेले हे पीक पावसामुळे सडू लागले आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांना यंदाची दिवाळी साजरी करता येणार नाही, असे चित्र आहे. मतदानाच्या निकालाने तालुक्यात गजबजाट असला तरी पावसाने शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

मुलामुलींचे कपडे कसे घ्यायचे ?
सोयाबीन या पिकावर अवलंबून असलेला शेतकरी दिवाळीत मुलामुलींच्या कपड्यालत्त्यासह कुटुंबातील विवाह प्रसंगाचे नियोजन करतो. मात्र, यंदा त्याचे स्वप्न या परतीच्या पावसात वाहून गेले आहे. यंदा पावसामुळे कपाशी पिकाच्या पाती गळू लागल्या, तर बोंडाची वाढ खुंटल्याने सीतादही होणे कठीण झाले आहे.

Web Title: Farmers' Diwali in the dark this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.