शेतकऱ्यांनो! फवारणी करताना घ्या काळजी; कृषी विभागाचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 06:56 PM2020-10-29T18:56:11+5:302020-10-29T18:56:35+5:30

Amravati news agriculture कीटकनाशकांची फवारणी करताना जीविताला कोणताही धोका होणार नाही, यासाठी काळजी घेण्याचे आवाहन पंचायत समिती कृषी विभाग व तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

Farmers! Be careful when spraying; Appeal of the Department of Agriculture | शेतकऱ्यांनो! फवारणी करताना घ्या काळजी; कृषी विभागाचे आवाहन

शेतकऱ्यांनो! फवारणी करताना घ्या काळजी; कृषी विभागाचे आवाहन

Next
ठळक मुद्देदर्यापूर तालुक्यात २७ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड

अनंत बोबडे 
लोकमत न्यूज नेटवर्क 
अमरावती : दर्यापूर तालुक्यात एकूण २७ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड असून, पिकावर कीड येऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शेतकऱ्यांकडून  कीटकनाशकांची फवारणी अधिक प्रमाणात करण्यात येत आहे. कीटकनाशकांची फवारणी करताना जीविताला कोणताही धोका होणार नाही, यासाठी काळजी घेण्याचे आवाहन पंचायत समिती कृषी विभाग व तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

किडीपासून पिके वाचविण्यासाठी शेतकरी कीटकनाशकांचा आधार घेतो. परंतु फवारणी करताना आवश्यक ती काळजी घेत नसल्याने दोन वर्षांपूर्वी  अनेक शेतकऱ्यांना जीवाला मुकावे लागले. दरम्यान विषबाधा होऊन त्यांच्या जीविताची हानी होण्याच्या तीन वर्षांपूर्वीच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून जनजागृती करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊ नये म्हणून विशेष काळजी घेण्याचे आवाहन पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी उद्धव भायेकर व तालुका कृषी अधिकारी राजकुमार अडगोकार यांनी केले आहे.

ही घ्या काळजी
लेबलमधील दिशानिर्देश काळजीपूर्वक वाचावेत आणि त्यांचे अनुसरण करावे. त्यावरील इशारा आणि सावधगिरीकडे विशेष लक्ष द्यावे.
कीटकनाशकांचे रिकामे डबे, बाटल्या, खोकी आदींचा पुनर्वापर करू नये. कीटकनाशके हाताळताना सुरक्षिततेच्या दृष्टीने रबरी हातमोजे, लांब पँट आणि लांब बाहीचे शर्ट वापरावेत. कीटकनाशके वापरानंतर लगेच कपडे बदलून हात धुवावेत. उघड्या हातांनी कीटकनाशक औषधी कधीही ढवळू नयेत. त्याकरिता काठीचा वापर करावा.  शिल्लक द्रावण जमिनीत खड्डा करून पुरावे. नोझल स्वच्छतेसाठी तोंडाने फुंकू नये. त्यासाठी तार किंवा काडीचा वापर करावा. उपाशीपोटी फवारणी करू नये.

कीटकनाशकांच्या विषबाधेची लक्षणे
:    अत्यंत अशक्तपणा आणि थकवा.
:    त्वचा चुरचुरणे, जळजळणे, जास्त         घाम येणे, डाग पडणे.
:    डोळ्यांना खाज सुटणे, जळजळ         होणे, पाणी गळणे, अंधुक दृष्टी,         बुबुळे लहान किंवा रुंद होणे.
:    तोंड व घशात जळजळणे, लाळ         गळणे, मळमळ, उलट्या होणे,         ओटीपोटात दुखणे, अतिसार होणे.
:    डोकेदुखी, चक्कर येणे, संभ्रम,         बेचैनी, स्नायू आखडणे, लडखडत         चालणे, अस्पष्ट बोलणे, फिट येणे,         बेशुद्धी.
:    खोकला, छातीतील वेदना आणि         घट्टपणा, श्वास घेण्यास त्रास होणे,         घरघर करणे.

Web Title: Farmers! Be careful when spraying; Appeal of the Department of Agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी