वरूडचा शेतकरी घेतो वर्षाला पंधरा लाखांचे उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:13 IST2020-12-24T04:13:16+5:302020-12-24T04:13:16+5:30
वांगी, टोमॅटो, मिर्ची पिकाला प्राधान्य, साडेचार एकरांत यशाची शेतीवरूड : स्थानिक ४८ वर्षीय शेतकऱ्याने व्यवसायापेक्षा शेतीला महत्त्व देऊन आधुनिक ...

वरूडचा शेतकरी घेतो वर्षाला पंधरा लाखांचे उत्पादन
वांगी, टोमॅटो, मिर्ची पिकाला प्राधान्य, साडेचार एकरांत यशाची शेतीवरूड : स्थानिक ४८ वर्षीय शेतकऱ्याने व्यवसायापेक्षा शेतीला महत्त्व देऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून सावंगा शेतशिवारात असलेल्या साडेचार एकर शेतीतून एक वर्षात पंधरा लाख रुपयांचे उत्पादन काढतो. यामध्ये संत्र्यापेक्षा वांगी, टोमॅटो, मिरची, काकडी, कारली ही पालेभाज्या पिके घेऊन उत्पादन काढले जाते. शेती करताना वेळेचे महत्त्व जाणून मशागतीपासून तर लागवड आणि उत्पादनापर्यंत काळजी घेऊन लाखो रुपयांचे उत्पादन काढून शेती फायदेशीर कशी असते, हे दाखवून दिले.
वरूड येथील शेतकरी हरिभाऊ विघे यांचे मालकीचे मौज सावंगा शेतशिवारात साडेसात एकर शेत असून, वाहितीमध्ये साडेचार एकर आहे. यात संत्रा झाडेसुद्धा आहे. परंतु, संत्र्यापेक्षा पालेभाज्या पिकांना महत्त्व देऊन वांगी, टोमॅटो, मिरची, काकडी, कारली ही पालेभाज्यांची पिके हरिभाऊ विघे घेतात. प्रत्येकाचे क्षेत्र वेगळे असते. पाऊण एकरात वांगी असून, ती आतापर्यंत दोन लाख रुपये देऊन गेली. एक एकरातील मिरची तीन लाखांत गेली. काकडीचे एक एकरात चार लाखांचे पीक झाले. अर्धा एकरात दीड लाख रुपयांची कारली आणि एक लाख रुपये असे उत्पादन घेतले आणि तेही खरीप हंगामातील सह महिन्यांत. रबी हंगामातसुद्धा त्याच जागेवर उन्हाळी टोमॅटो आणि काकडीची लागवड करून तीन ते चार लाख रुपयांचे उत्पादन काढत असल्याचे हरिभाऊ सांगतात. वेळेचे भान, वातावरणीय बदल व बाजारपेठेच्या अंदाज घेऊन शेती केल्यास शेतीमध्ये फायदाच होतो, असे ते सांगतात.
मल्चिंगचा शीटचा वापर
मल्चिंग शीटचा वापर करून रोपे लावली जातात. यामुळे निंदण करावे लागत नाही. संत्र्यापेक्षा हंगामी पिके घेतल्यास अधिक फायदा मिळत असल्याचे सांगतात .
शेतीव्यवसाय फायद्याचाच
संत्र्याचे मशागतीवर अवाढव्य खर्च करूनसुद्धा वेळेवर भाव मिळत नाही. म्हणून मी जीवनाश्यक पिके घेतली.यात ३५ टक्के खर्च होतो, तर ६५ टक्के निव्वळ नफा मिळतो, हा यशाचा मंत्र शेतकरी हरिभाऊ विघे यांनी दिला.