शेतकऱ्याला हवी गांजा लागवडीची परवानगी
By Admin | Updated: June 6, 2017 00:13 IST2017-06-06T00:13:19+5:302017-06-06T00:13:19+5:30
शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने गांजा या पिकाच्या लागवडीची परवानगी द्यावी, ...

शेतकऱ्याला हवी गांजा लागवडीची परवानगी
शासनाचा निषेध : मोफत वाटला कांदा
लोकमत न्यूज नेटवर्क
टाकरखेडा संभू : शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने गांजा या पिकाच्या लागवडीची परवानगी द्यावी, जेणेकरून आम्ही आमच्या परिवाराची उपजिविका करू, अशी मागणी बेलोरा येथील मंगेश ठाकरे या शेतकऱ्याने केली आहे.
शेतात पिकविलेल्या कांद्याला उत्पादनाच्या तुलनेत योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी कांद्याचे मोफत वाटप करीत शासनाच्या धोरणाचा निषेध व्यक्त केला. याबाबतचे निवेदन त्यांनी तहसीलदार यांना दिले आहे.
तूर, मूंग, उडीद, कापूस, सोयाबीन, चना, गहू व संत्रा ही जिल्ह्यातील महत्त्वाची पिके आहेत. यावरच येथील शेतकरी आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत असतो. एकतर हवामानामुळे पिकाचे नुकसान, तर दुसरीकडे शेतीमालाला हमीभाव देण्यात आलेले नाही. यामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या नाही तर काय करायचे, असा प्रश्न मंगेश ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
याबाबतचे निवेदन त्यांनी चांदूरबाजार येथील तहसीलदारांना दिले आहे. त्याचा निषेध व्यक्त करीत त्यांनी कांद्याचे गरजूंना मोफत वाटप केले.