धामणगाव बाजार समितीवर शेतकरी-शेतमजूर पॅनेलचा झेंडा

By Admin | Updated: October 6, 2015 00:18 IST2015-10-06T00:18:27+5:302015-10-06T00:18:27+5:30

सहकार क्षेत्रात महत्त्वाच्या असलेल्या येथील बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाचे नेते अरूण अडसड, ..

Farmer-farm worker's flag at Dhamangaon Market Committee | धामणगाव बाजार समितीवर शेतकरी-शेतमजूर पॅनेलचा झेंडा

धामणगाव बाजार समितीवर शेतकरी-शेतमजूर पॅनेलचा झेंडा

भाजप गटाचा १० जागांवर विजय : काँग्रेस गटाला आठ जागा
धामणगाव रेल्वे : सहकार क्षेत्रात महत्त्वाच्या असलेल्या येथील बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाचे नेते अरूण अडसड, राँकाचे माजी जि़प़ अध्यक्ष विजय भैसे, सहकार नेते विजय उगले यांच्या नेतृत्त्वातील शेतकरी, शेतमजूर पॅनेलने दहा जागांवर विजय मिळविला. काँग्रेसच्या वाट्याला आठ जागा आल्या आहेत.
सोमवारी सकाळी ९ वाजता टीएमसी भवन येथे बाजार समितीच्या अठरा जागांसाठी मतमोजणीला सुरूवात झाली. सर्वप्रथम सेवा सहकारी संस्थेच्या विमुक्त भटक्या जमाती मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरूवात झाली. यात भाजप गटाचे दिलीप लांबाडे ३ मतांनी विजयी झाले लांबाडे यांना १८७ तर त्यांचे प्रतीस्पर्धी काँग्रेस गटाचे उमेदवार संजय गाडवे यांना १८४ मते मिळालीत़ मागील अनेक वर्षांपासून सहकार क्षेत्रात असलेले बबन मांडवगणे यांचा अवघ्या पाच मतांनी सेवा सहकारी संस्था इतर मागास वर्गीय प्रभाग मतदारसंघातून पराभव झाला़ मांडवगणे हे काँग्रेस गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात होते़ भाजप गटाचे धीरज मुडे यांनी त्यांचा १८५ मतांनी पराभव केला़
महिला मतदारसंघात भाजप गटाचे वर्चस्व
सेवा सहकारी संस्था महिला राखीव मतदार संघात वाठोडा येथील सरपंच स्रेहल संजय जायले या १८८ मते घेवून विजयी झाल्यात तर याच मतदार संघातील प्रिती अमर हांडे या १८४ मते घेवून विजयश्री मिळविली. दोन्ही महिला भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, तसेच सहकार गटातील विजय उगले यांच्या पॅनेलच्या उमेदवार आहेत. त्यांनी काँग्रेस गटाच्या गाडवे व ज्योती शेंडे यांचा पराभव केला आहे़

मतदारांनी शेतकरी हिताच्या पॅनेलच्या उमेदवारांना विजयी केले. अल्प मतांनी आमच्या काही उमेदवारांचा पराभव झाला. मागील पाच वर्षांत या बाजार समितीत भ्रष्टाचार झाल्यामुळे मतदारांनी त्यांना नाकारले.
- अरूण अडसड,
भाजप नेते.

शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही नेहमी लढत राहणार आहे़ काही मतदारसंघाची फेरमतमोजणीची मागणी केली. परंतु विरोधी गटाने सत्तेचा उपयोग करून ही मतमोजणी होऊ दिली नाही, अन्यथा फेर मतमोजणीत विजय आमचाच झाला असता़
- श्रीकांत गावंडे, काँग्रेस नेते.

Web Title: Farmer-farm worker's flag at Dhamangaon Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.