शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

उमेदवारी अर्जात खोटी माहिती, अचलपूरचे आमदार बच्चू कडूंवर दोषारोपपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 7:50 PM

अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी आसेगाव पोलिसांनी चांदूरबाजार येथील प्रथमश्रेणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्यांना १६ फेब्रुवारीला न्यायालयात उपस्थित राहण्यास बजावण्यात आले आहे. चांदूर बाजारचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी याबाबत आसेगाव ठाण्यात तक्रार दिली होती.

ठळक मुद्देप्रथमश्रेणी न्यायालयाचा समन्स : १६ फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी आसेगाव पोलिसांनी चांदूरबाजार येथील प्रथमश्रेणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्यांना १६ फेब्रुवारीला न्यायालयात उपस्थित राहण्यास बजावण्यात आले आहे. चांदूर बाजारचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी याबाबत आसेगाव ठाण्यात तक्रार दिली होती.विधानसभा निवडणुकीदरम्यान २७ सप्टेंबर २०१४ रोजी ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर करावयाच्या शपथपत्रातील फॉर्म २६ मध्ये नमूद केलेल्या संपत्तीच्या तपशिलात १९ एप्रिल २०११ रोजी मुंबई गृहनिर्माण सहकारी संस्थेने मंजूर केलेल्या इमारत क्र. २ मधील २-सी गाळा क्रमांक ३०२ या सदनिकेची ४२ लाख ४६ हजारांच्या संपत्ती खरेदी केल्याची माहिती नाही. ही संपत्ती खरेदी करण्यासाठी त्यांनी मुंबईच्या कुर्ला येथील महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह बँकेच्या शाखेतून १ फेब्रुवारी २०१० रोजी कर्ज घेतले होते. या गृहकर्जाचा उल्लेख त्यांनी निवडणूक अर्जात केला. संपत्ती कमी व कर्ज जास्त दाखवून निवडणूक आयोगाची व जनतेची दिशाभूल केल्याची तक्रार २८ डिसेंबर २०१७ रोजी चांदूरबाजार नगर परिषदेचे तत्कालीन बांधकाम व शिक्षण सभापती गोपाल तिरमारे यांनी केली होती.यावरून पोलिसांनी बच्चू कडूंवर लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ चे कलम १२५ अ अन्वये गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या पुढील तपासाची परवानगी चांदूरबाजारचे प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांनी दिली. याची शहानिशा केल्यावर बच्चू कडू यांची मुंबईत सदनिका असल्याचे व सोबतच घेतलेले गृहकर्ज फेडल्याचे व कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र ०५ जून २०१७ रोजी बँकेने दिल्याचे निष्पन्न झाले. बच्चू कडू यांनी सादर केलेल्या नामनिर्देशपत्रात सदनिके चा उल्लेख केला नाही. प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिली असल्याचा व माहिती लपविल्यास तो अपराध होतो, अशी माहिती अचलपूरचे उपविभागीय अधिकारी तथा मतदान नोंदणी अधिकारी यांनी १० जानेवारी २०१८ रोजी आसेगाव पोलिसांना दिली. तथापि, आमदार कडू यांनी आसेगाव पोलिसांच्या तपासणीदरम्यान दिलेल्या पत्रामध्ये सदर सदनिका त्यांच्या मालकीची नसल्याचे कुठेही नाकारले नाही.त्यांचे हे कृत्य निवडून येण्यासाठी हेतुपुरस्सर लपविल्याचे व खोटे शपथपत्र निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे सादर केल्याचे दिसून येते. लोकप्रतिनिधी कायदा १९५१ चे कलम ३३ (अ) चा भंग असल्याचे कृत्य या कायद्याचे कलम १२५ (अ) नुसार अपराध होत असल्याने दोषारोपपत्र आसेगावचे ठाणेदार अजय आकरे यांनी चांदूर बाजारचे प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या समक्ष दाखल केले. यासंदर्भात आमदार कडू यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, प्रतिसाद मिळाला नाही.तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करून न्यायालयात सादर केले आहे. त्यानुसार, न्यायालयाने समन्स बजावला आहे.- अजय आकरे,ठाणेदार, आसेगाव पोलीस ठाणे

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूMLAआमदार