शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

रवी राणांच्या प्रचारसभेत फडणवीसांचे 'ते' शब्द खरे ठरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 13:30 IST

Amravati : महाविकास आघाडी भुईसपाट करण्याची स्वप्नपूर्ती

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : महायुतीतून युवा स्वाभिमान पार्टीचे बडनेराचे उमेदवार रवी राणा यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ८ नोव्हेंबर रोजी येथील गोपालनगर टी पॉइंटवर प्रचार सभा घेतली होती. या सभेत फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या डोक्याचे नट रवी राणांच्या 'पाना'ने कसायचे आहेत, अशी बोचरी टीका केली होती. अखेर विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर फडणवीसांनी राज्यातून महाविकास आघाडी भुईसपाट करण्याची स्वप्नपूर्ती बघितली होती, ती पूर्ण झाली. म्हणून रवी राणांच्या प्रचार सभेतील फडणवीसांचे 'ते' शब्द खरे ठरले, आता याविषयी जोरदार चर्चा रंगत आहे.

बडनेराचे आमदार रवी राणा हे भाजपचे मित्रपक्ष असून त्यांची विकासात्मक कामे फार मोठी आहेत. खरे तर त्यांना मतदारसंघात प्रचार करण्याची गरजच नाही. कारण त्यांचे निवडणूक चिन्ह 'पाना' आहे, याच पान्याने येत्या काळात महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या डोक्याचे नट कसायचे आहेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. भाजपच्या कोट्यातून बडनेराची जागा रवी राणा यांना देण्यात आली असून त्यांचे बोधचिन्ह पाना आहे. ते कोणाकोणाचे नट कसतील माहीत नाही. पण आम्हालादेखील विरोधकांच्या डोक्याचे नट कसायचे आहेत, त्यासाठी तुमच्या पान्याची आवश्यकता पडेल, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला होता. अखेर विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येताच महायुतीने २३५ जागांवर विजय मिळवीत महाविकास आघाडीला 'जोर का धक्का घिरे से' अशीच धोबीपछाड दिली आहे. बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या प्रचार सभेत काढलेले शब्द खरे ठरल्याने 'ती' सभा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या 'लकी' ठरली, यात दुमत नाही.

रवी राणांचा विजयाचा चौकार अन् इतिहास नोंदविला बडनेरा मतदारसंघात निवडणुकीच्या काळात आमदार रवी राणा यांच्या 'किराणाची धूम पाहावयास मिळाली. त्यातच लाडक्या बहिणींचे मतदान बोनस ठरले. रवी राणा हे राजकारणातील अजब रसायन असल्याचे त्यांनी सिद्ध केले आहे. राणांनी आपला विजय हा भगव्या-निळ्या वादळाचा असल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. बडनेरा मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून राजकीय ताकद उभी करणारे एकमेव ते आमदार ठरले आहेत. त्यामुळे नव्या महायुती सरकारमध्ये रवी राणांना मंत्रिपदाची संधी हमखास मानली जात आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRavi Ranaरवि राणाAmravatiअमरावतीbadnera-acबडनेरा