शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

उलटचोच तुतारी पक्ष्याची जिल्ह्यात प्रथमच नोंद

By admin | Updated: May 4, 2016 00:19 IST

परतीच्या प्रवासात असणाऱ्या उलटचोच तुतारी या दुर्मिळ पक्ष्याची जिल्ह्यातील सावंगा तलावावर प्रथम नोंद झाली आहे.

अमरावती : परतीच्या प्रवासात असणाऱ्या उलटचोच तुतारी या दुर्मिळ पक्ष्याची जिल्ह्यातील सावंगा तलावावर प्रथम नोंद झाली आहे. या पक्ष्याची विदर्भातील पक्ष्यांच्या सूचित फार पूर्वी नोंद झाली. मात्र हा पक्षी जिल्ह्यात प्रथमच आढळल्याची माहिती मानद वन्यजीव रक्षक जयंत वडतकर यांनी दिली. हिवाळ्यात हजारो किमीचा प्रवास करून विविध प्रजातीचे पक्षी देश-विदेशातून जिल्ह्यातील तलावांवर येतात. हिवाळा संपल्यानंतर हे पक्षी परतीच्या प्रवासाला लागतात. मार्चमध्ये आपल्या भागातील पक्षी परत गेल्यानंतर एप्रिल व मे महिन्यात दक्षिण भारतातून स्थलांतर करून जाणारे पक्षी परतीच्या प्रवासाला लागतात. दरम्यान, ते पक्षी काही दिवस किंवा थोडा काळासाठी तरी मुक्काम करतात. त्यावेळी पक्षी निरीक्षकांना या स्थलांतरित पक्ष्यांना पाहण्याची संधी मिळते. वाईल्ड लाईफ अ‍ॅन्ड एन्व्हॉयर्न्मेंट कन्झर्व्हेशन सोसायटीचे पक्षी अभ्यासक आशिष चौधरी व मनोहर खोडे वरुडनजीकच्या सावंगा तलावावर पक्षी निरीक्षण करीत असताना त्यांना उलटचोच तुतारी पक्षी आढळून आला. हा पक्षी आकाराने सामान्य तुतारी पक्ष्यापेक्षा पाच सेंटीमीटरने मोठा असून यांची चोच काळ्या रंगाची, जाड, लांब व वरच्या दिशेने वळलेली असते. पायाचा रंग पिवळा असून पाय लांब असतात, तसेच शरीराचा रंग राखडीसारखा असतो. खांद्यावर काळपट रंग व छातीचा भाग पांढरा असतो. या पक्षाचे शास्त्रीय नाव झेनुस सिनेरिअस असे असून मराठीतील ओळक उलटचोच तुतारी अशी आहे. महाराष्ट्रामध्ये हा पक्षी समुद्रकिनाऱ्यावर नियमीतपणे आढळून येतो. मात्र, विदर्भात तो केवळ परतीच्या प्रवासात दिसून येतो. वेक्सचे सचिव जयंत वडतकर, निनाद अभंग, किरण मोरे, शिशिर शेंडोकार, गजानन वाघ, गजानन बापट, सौरभ जवंजाळ, मनीष ढाकुलकर यांचा पक्षी निरीक्षणात सहभाग आहे.