जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये अतिवृष्टी, पाऊस असमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:17 IST2021-09-08T04:17:24+5:302021-09-08T04:17:24+5:30

अमरावती : सोमवारी सायंकाळपासून कोसळत असलेला पाऊस जिल्ह्यात सर्वत्र नव्हता. १४ तालुक्यांपैकी केवळ सात तालुक्यंमध्ये पावसाने अतिवृष्टीची नोंद केली. ...

Extreme rainfall, uneven rainfall in six talukas of the district | जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये अतिवृष्टी, पाऊस असमान

जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये अतिवृष्टी, पाऊस असमान

अमरावती : सोमवारी सायंकाळपासून कोसळत असलेला पाऊस जिल्ह्यात सर्वत्र नव्हता. १४ तालुक्यांपैकी केवळ सात तालुक्यंमध्ये पावसाने अतिवृष्टीची नोंद केली. त्यातही काही मंडळामध्येच पावसाची नोंद झाली आहे. २४ तासांतील सरासरी भातकुली तालुक्यात सर्वाधिक १०९ मिमी आहे. यामध्ये निंभी (१६४.५ मिमी), आसरा (१२९.० मिमी), खोलापूर (७२.३ मिमी) मंडळात सर्वाधिक पाऊस झाला. त्याखालोखाल १०२.६ मिमी पावसाची सरासरी गाठणाऱ्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यात दाभा १७२ मिमी, लोणी १४१ मिमी, नांदगाव खंडेश्वर ७८.८ मिमी, शिवणी ८७.५ मिमी, पापळ ९० मिमी, धानोरा ९१ मिमी, माहुली मंडळात १०७.५ अशी अतिवृष्टीची नोंद झाली. केवळ मंगरूळ चव्हाळा मंडळात ५३ मिमी पाऊस कोसळला. चांदूर रेल्वे तालुक्यात ७२.४ मिमी पाऊस कोसळला. चांदूर रेल्वे मंडळात ८३ मिमी, पळसखेड ८१.८ मिमी, आमला ७३.८ मिमी अशी अतिवृष्टीची नोंद झाली.

तिवसा तालुक्यात ८३.६ मिमी अशी पावसाची नोंद झाली. तिवसा (७५.३ मिमी), वरखेड (८३ मिमी), कुऱ्हा (९०.३ मिमी), वऱ्हा (८५.८ मिमी), मोझरी (८५.५ मिमी) अशा सर्व मंडळांमध्ये अतिवृष्टीचा पाऊस कोसळला. दर्यापूर तालुक्यात रामतीर्थ मंडळात ७३.३ मिमी, सामदा मंडळात ८८.३ मिमी व थिलोरी मंडळात सर्वाधिक १३१.८ मिमी पावसाची नोंद झाली. तथापि, तालुक्यात २४ तासांत ६६.२ मिमी पाऊस झाला. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील विहिगाव मंडळात ७७.३ मिमी, कापूसतळणी ७९ मिमी, कोकर्डा मंडळात ७८ मिमी पाऊस झाला. तो सरासरीपेक्षा अधिक होता. धामणगाव रेल्वे तालुक्यातील चिंचोली (८० मिमी), भातकुली (९९.३ मिमी)अंजनसिंगी (७३ मिमी), मंगरूळ (७७ मिमी), तळेगाव (९८ मिमी) अशा मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

मोर्शी, वरूड, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, अचलपूर, चांदूर बाजार, चिखलदरा, धारणी या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी अर्थात ७२ मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली नाही. विशेषत: धारणी व चिखलदरा तालुक्यात आतापर्यंत सरासरीच्या ६७.४ व ५३.८ अशी पावसाची सरासरी राहिली आहे. त्यादृष्टीने यंदाच्या पावसाळ्यात हे तालुके कोरडेच राहिले आहेत.

Web Title: Extreme rainfall, uneven rainfall in six talukas of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.