पाणीटंचाईच्या उपाययोजनांना ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 23:47 IST2019-07-16T23:47:14+5:302019-07-16T23:47:36+5:30
शासनाने दिलेली मुदतवाढ १५ जुलै रोजी संपल्यानंतर तहानलेल्या ३०० हून अधिक गावांतील पाणीटंचाईच्या उपाययोजनांची ३१ आॅगस्टपर्यंत मुदत वाढविल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांनी दिली. जिल्ह्यात पावसाची सद्यस्थितीत १३२ मिमी म्हणजेच ४६ टक्के पावसाची तूट आहे. त्यामुळे गावागावांतील पाणीपुरवठ्याचे उद्भव असलेले जलस्रोत कोरडे आहेत. धरणक्षेत्रात पावसाचा अभाव असल्याने लघुप्रकल्पात अद्यापही मृत साठाच आहे.

पाणीटंचाईच्या उपाययोजनांना ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शासनाने दिलेली मुदतवाढ १५ जुलै रोजी संपल्यानंतर तहानलेल्या ३०० हून अधिक गावांतील पाणीटंचाईच्या उपाययोजनांची ३१ आॅगस्टपर्यंत मुदत वाढविल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांनी दिली.
जिल्ह्यात पावसाची सद्यस्थितीत १३२ मिमी म्हणजेच ४६ टक्के पावसाची तूट आहे. त्यामुळे गावागावांतील पाणीपुरवठ्याचे उद्भव असलेले जलस्रोत कोरडे आहेत. धरणक्षेत्रात पावसाचा अभाव असल्याने लघुप्रकल्पात अद्यापही मृत साठाच आहे. ऊर्ध्व वर्धा प्रकल्पात केवळ १२ टक्के साठा आहे. वर्धा नदी प्रवाहित नसल्यामुळे काठालगतच्या गावांत पाण्याची भीषण टंचाई आहे. त्यामुळे टँकर व खासगी विहिरींचे अधिग्रहणाद्वारे या गावांची तहान भागविली जायची. मात्र, पाणीटंचाईच्या उपाययोजनांसाठी शासनाने दिलेली १५ जुलैची मुदत संपल्याने या गावात बिकट समस्या निर्माण झाली होती. ‘लोकमत’द्वारा या ही समस्या जनदरबारात मांडली असता, जिल्हा प्रशासनाने स्थानिक पातळीवरच्या अधिकारांचा वापर करीत या सर्व उपाययोजनांना आता ३१ जुलैपर्य$ंत मुदतवाढ दिलेली आहे.
जिल्ह्यात मुदतीच्या आत ५४ टँकर व ३५४ खासगी अधिग्रहणातील विहिरींद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेकडून पाणीपुरवठ्याच्या तात्पुरत्या काही योजना सुरू होत्या. त्यालाही आता मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
२३ लघुप्रकल्पात शून्य टक्के साठा
जिल्ह्यात ४६ लघुप्रकल्प आहेत. यामध्ये ९७.९८ प्रकल्पीय संकल्पित जलसाठ्याच्या तुलनेत ६.८६ टक्केच साठा आहे. सूर्यगंगा, दहिगाव धानोरा, मालेगाव, खतिजापूर,, गोंडवाघोली, गोंडविहीर,मालखेड, बासलापूर, सरस्वती, भिवापूर, जळका, अमदोरी, दाभेरी, त्रिवेणी, शेकदरी, पंढरी, सातनूर, जामगाव, बेलसावंगी, नागठाणा, जमालपूर, पुसली या २३ प्रकल्पात शून्य जलसाठा आहे.
जिल्ह्यात पावसाची तूट आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर असलेल्या अधिकारान्वये ३१ जुलैपर्यत पाणीटंचाईच्या उपाययोजनांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
- नितीन व्यवहारे
निवासी उपजिल्हाधिकारी