लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या सहा महिन्यात तब्बल २३१७ गुन्हे नोंदविले गेले. गतवर्षीच्या पहिल्या सहा महिन्यांच्या तुलनेत यंदा त्यात ३६६ ने वाढ नोंदविली गेली. खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दुखापत, बलात्कार, घरफोडी, आत्महत्येस प्रवृत्त करणे, अपहरण, विश्वासघात अशा अनेक गुन्ह्यात वाढ झाली आहे. खून, खुनाचा प्रयत्न व दुखापतीच्या गुन्ह्यात झालेली वाढ चिंताजनक आहे.
चोरी, घरफोडीदेखील वाढली आहे. एसटी आगारातील चोऱ्या अर्थात एसटी बसमध्ये बसत असताना झालेले चोरीचे वाढलेले प्रकारदेखील प्रवाशांसाठी चिंतेचे कारण बनले आहेत. अलीकडे चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, अंजनगाव, वरूड व मोर्शी येथील बस स्थानकातून लाखोंच्या सोन्याचांदीचे दागिने व रोख रकमेवर डल्ला मारण्यात आला आहे. सदोष मनुष्यवध, अपघात, सरकारी कर्मचाऱ्यांवरील हल्ला, विनयभंगांच्या घटना घटल्या आहेत. वाहनचोरी वाढल्याने वाहन पार्क करायचे तरी कुठे आणि चोरीपासून बचाव करण्यासाठी नेमके कुठली कुलूपे वापरावीत, असा प्रश्न वाहनधारकांना पडला आहे.
बलात्कार वाढले; विनयभंगात घटगेल्या सहा महिन्यात ग्रामीण भागात बलात्काराचे ५९ एफआयआर नोंदविले गेले. गतवर्षी ती संख्या ४४ अशी होती. यंदा बलात्काराच्या घटनांत १५ ने वाढ झाली. विनयभंगाचे १३३ एफआयआर नोंदविले गेले. गतवर्षी ती संख्या १४९ होती. यंदाच्या सहा महिन्यात १२९ मुलामुलींना पळवून नेण्यात आले.
शीर्षक सन २०२५ सन २०२४खून २२ १७खुनाचा प्रयत्न ३४ २५दरोडा ५ ५घरफोडी ९८ ७४चोरी ३६१ २६४वाहनचोरी ११६ ९२दुखापत ७६१ ६४७
"जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारीतील ३१ पोलिस ठाण्यात पहिल्या सहा महिन्यात भारतीय न्याय संहितेअंतर्गत (बीएनएस) एकूण २३१७ गुन्हे नोंदविले गेले. त्याचवेळी सरासरी डिटेक्शन रेट चांगला आहे."- विशाल आनंद, पोलीस अधीक्षक