अमरावती विद्यापीठाचे मानांकन घसरल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 08:00 IST2021-08-27T08:00:00+5:302021-08-27T08:00:17+5:30

Amravati News संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे मानांकन घसरणे ही बाब विद्यार्थ्यांसह पालकांसाठी चिंतनीय ठरणारी आहे.

Excitement in the education sector due to the decline in the rating of Amravati University | अमरावती विद्यापीठाचे मानांकन घसरल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ 

अमरावती विद्यापीठाचे मानांकन घसरल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ 

ठळक मुद्देसंशोधन, विद्यार्थी प्रगती माघारल्याचा ठपकानॅक मूल्यांकन चमूच्या अहवालानंतर विद्यार्थ्यांमध्ये चिंता

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे मानांकन घसरणे ही बाब विद्यार्थ्यांसह पालकांसाठी चिंतनीय ठरणारी आहे. नॅक पिअर चमूने संशोधन, विद्यार्थी प्रगती माघारल्याचा ठपका ठेवणे ही बाब विद्यापीठातील अधिकाऱ्यांसाठी चिंतन करणारी आहे. २०१०, २०१६ आणि २०२१ असे तीनदा नॅक मू्ल्यांकनाचे सीजीपीए तपासले असता, वास्तविकता लक्षात येते.

(Excitement in the education sector due to the decline in the rating of Amravati University)

विद्यापीठाचे नॅक मू्ल्यांकन घसरले असता प्रशासकीय अधिकारी ‘तो मी नव्हेच’ अशा अविर्भावात वागत आहे. नॅक पिअर चमूने ९ ते ११ ऑगस्टदरम्यान विद्यापीठाचे मूल्यांकन करण्यात आले. त्यानंतर चार दिवसातच नॅक चमूने ऑनलाईन अहवाल पाठविला. यंदा विद्यापीठाच्या मानांकनात मोठी घसरण होऊन २.९३ पॉईंटर मिळाले आहे. ‘बी प्लस’ दर्जा मिळाल्याने सर्वांना धक्का बसला आहे. अमरावती विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण विभाग आणि तज्ज्ञ प्राध्यापकांची फौज असताना संशोधन कार्य बोटावर मोजण्याईतके असल्याचा ठपका नॅक पिअर चमूने ठेवला आहे.

तत्कालीन कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी नॅक मू्ल्यांकनासाठी जोरदार तयारी चालविली होती. बैठकांचे सत्र, ऑनलाईन सादरीकरण, सामाजिक कार्य, शैक्षणिक उपक्रम, ऑनलाईन परीक्षा, मू्ल्यांकन अशी जमेची बाजू होती. मात्र, कुलगुरू चांदेकर यांचा कार्यकाळ संपताच नॅक मूल्यांकन केवळ कागदाेपत्री राहिले. परिणामी नॅक चमूच्या मूल्यांकनातून वास्तव पुढे आले आणि सन २०१६ मध्ये ३.०७ सीजीपीए असताना आता २.९३ एवढा मिळाला आहे.

 

अमरावती विद्यापीठाला २०१६ मध्ये नॅकचा अ श्रेणी दर्जा प्राप्त झाला होता. गत पाच वर्षात हा दर्जा कायम ठेवण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले नाही. परीक्षा ढासळल्या, मू्ल्यांकन थांबले. कॉलेजस्तरावर परीक्षा होत आहेत. शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी भरती नाही. नवीन ईनोव्हेटिव्ह अभ्यासक्रम नाही. प्लेसमेंट सेल नाही. अशा विविध बाबी नॅक मानांकन दर्जा घसरण्याची कारणे आहेत.

- प्रवीण रघुवंशी, अध्यक्ष नुटा संघटना.

Web Title: Excitement in the education sector due to the decline in the rating of Amravati University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.