उत्कृष्ट कार्याला कौतुकाची थाप

By Admin | Updated: May 2, 2016 00:08 IST2016-05-02T00:08:49+5:302016-05-02T00:08:49+5:30

गुन्हे उघडकीस आणण्याबरोबर उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल तीन पोलीस निरीक्षकांसह ६२ अधिकारी-कर्मचाऱ्यांना रविवारी सन्मानित करण्यात आले.

Excellent work is commendable | उत्कृष्ट कार्याला कौतुकाची थाप

उत्कृष्ट कार्याला कौतुकाची थाप

६२ पोलिसांना प्रशस्तीपत्र : आयुक्तांच्या हस्ते वितरण
अमरावती : गुन्हे उघडकीस आणण्याबरोबर उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल तीन पोलीस निरीक्षकांसह ६२ अधिकारी-कर्मचाऱ्यांना रविवारी सन्मानित करण्यात आले.
पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक गणेश अणे यांना ११ गुन्हे उघडकीस आणल्याबद्दल तर गुन्हे शाखेचे निरीक्षक डी.एम. पाटील यांना वाहन चोरी, चेनस्रॅचिंग व मुस्कान आॅपरेशनमध्ये चांगले काम केल्याबद्दल प्रशस्तीपत्र देण्यात आले. वाहतूक शाखेचे प्रभारी सहाय्यक पोलीस आयुक्त बळीराम डाखोरे यांनी अल्पकालावधीत २७८० वाहनधारकांवर कारवाईचा दंडूका उगारला तर गुन्हे शाखेत कार्यरत असलेले सहायक पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांनी अत्यंत क्लिष्ट असे २० गुन्हे उघडकीस आणल्याने ते प्रशस्तीपत्रांसाठी पात्र ठरले. याशिवाय वाचक शाखेतील सहपोलीस निरीक्षक निळकंठ कुकडे, सहायत पोलीस निरीक्षक दत्ता देसाई (गुन्हे शाखा), उपनिरीक्षक पंकज कांबळे, उपनि. पि.जे. वेरुळकर, उपनि. प्रवीण पाटील, उपनि. निर्मला भोईल, उपनि. प्राजक्ता धावडे, महिला उपनिरीक्षक आरडी चव्हाण, उपनि. जितेंद्र ठाकूर, उपनि. प्रशांत लभाणे, उपनि. गणेश अहिरे, सहाय्यक उपनि. अशोक मांगलेकर, याअधिकाऱ्यांचा समावेश आहे.

पोलिसांचे
मनोबल वाढविले
अमरावती : याशिवाय चद्रशेखर दोडके, प्रकाश ठाकरे, शरचंद्र खंडारे, बाळासाहेब वाघमारे, सुरेश वानखडे, जानराव देहाडे, लता उईके, संध्या नेहारे, शिवाली भारती, प्रमोद भुसारे, संग्राम भोजने, बन्सी भटकर, प्रवीण बुंदेले, गजानन सहारे, संजय देऊळकर, राजेश गुलालकर, राम गावनेर, राजू भेंडे, नरेंद्र ढोबळे, शंकर भगत, कमलेश शिंदे, प्रदीप ठाकरे, गजानन विधाते, अजय कोठे, विनय मोहोड, सतीश देशमुख, निखिल माहोरे, विजय ढोके, संजय कोहळे, सुनील विधाते, प्रवीण थोरवे, सागर, सारंग, उज्ज्वला सुर्वे, राजेश यादव, पूनम (१०८५), पल्लवी (१८८९) विजय देशपांडे, चेतन (१७५८), घनश्याम यादव, विनोद (१७७३), प्रेमदास मोहोड आणि वरिष्ठ लिपीक शेंडे या कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. (प्रतिनिधी)

डाखोरेंची उत्कृष्ट कामगिरी
शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त बळीराम डाखोरे यांनी वाहतूक नियमनासंदर्भात उत्कृष्ट कामगिरी केली. राजापेठ विभागाचे वाहतूक निरीक्षक म्हणून रेकॉर्ड ब्रेक २७८० वाहनांवर कारवाई केल्याने त्यांना पोलीस आयुक्तांच्या हस्ते प्रशस्तीपत्राने गौरविण्यात आले.
२० गुन्हे उघडकीस आणणारे कांचन पांडे
नागपुरी गट, शहर कोतवालीनंतर गुन्हे शाखेतही छाप सोडणारे सहायक पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांनी तब्बल २० गुन्हे उघडकीस आणले आहेत. सायबर सेलचे प्रमुख म्हणून पांडे यांनी सूक्ष्म तांत्रिक तपास केल्याने गुन्हे शाखेच्या कामगिरीत मोलाची भर पडली. ते तांत्रिक तपासातील तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात.

Web Title: Excellent work is commendable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.