दहावी, बारावीच्या पहिल्यांदाच २८०९ केंद्रांवर परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 05:00 IST2021-03-24T05:00:00+5:302021-03-24T05:00:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल आणि ...

Examination at 2809 centers for the first time in 10th and 12th standard | दहावी, बारावीच्या पहिल्यांदाच २८०९ केंद्रांवर परीक्षा

दहावी, बारावीच्या पहिल्यांदाच २८०९ केंद्रांवर परीक्षा

ठळक मुद्देप्रवेशित शाळा, महाविद्यालये केंद्र

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल आणि बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिलपासून होऊ घातली आहे. कोरोना संसर्गाच्या विळख्यामुळे प्रवेशित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयेच परीक्षा केंद्रे राहतील, असा निर्णय झाला आहे. यामुळे अमरावती विभागात पहिल्यांदाच तब्बल २८०९ केंद्रांवर परीक्षा होणार आहे. 
विभागीय शिक्षण मंडळाने अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलडाणा व अमरावती या पाचही जिल्ह्यांमध्ये दहावी, बारावीच्या परीक्षांचे नियोजन करण्यात येत आहे. शिक्षण मंडळाने कोविड-१९ च्या अनुषंगाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे परीक्षा केंद्रांवर पालन होण्यासाठी तयारी सुरू केली आहे. नियमित विद्यार्थ्यांना परीक्षेत अर्धा तास व अपंग विद्यार्थ्यांना एक तास अधिक वेळ देण्यात येणार आहे.
विभागात दहावीच्या एकूण २६४२ शाळांची नोंद आहे. गतवर्षी दहावीच्या परीक्षेसाठी ७१६ केंद्रे होती. मात्र, यंदा २५१० परीक्षा केंद्रे असतील. १३२ शाळांना डच्चू देण्यात आला आहे.
बारावीसाठी एकूण १५७७ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. त्यापैकी १५१९ परीक्षा केंद्रे राहतील. ५८ कनिष्ठ महाविद्यालयांना वंचित ठेवण्यात आले आहे. गतवर्षी ५०४ केंद्रे होती. यंदा १०१५ परीक्षा केंद्रे वाढली आहेत. 

राज्य शिक्षण मंडळाच्या सूचनेनुसार दहावी, बारावीच्या ऑफलाईन परीक्षांचे नियोजन सुरू आहे. दहावीसाठी १७९४, तर बारावी परीक्षेसाठी १०१५ केंद्रे वाढली आहेत. काही अपवाद वगळता विद्यार्थ्यांना त्याच शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात परीक्षा केंद्रे देण्यात आली आहेत. 
- शरद गोसावी, 
विभागीय अध्यक्ष, राज्य शिक्षण मंडळ.

 

Web Title: Examination at 2809 centers for the first time in 10th and 12th standard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.