परीक्षा २० ऑक्टोबरपासूनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 05:00 IST2020-10-15T05:00:00+5:302020-10-15T05:00:24+5:30
कुलगुरूंच्या दालनात सलग दोन दिवस बैठकांचे सत्र सुरूच होते. प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांंच्याकडून परीक्षांबाबतची तयारी कुलगुरूंनी जाणून घेतली. ऑनलाईन परीक्षेत येणाऱ्या तांत्रिक अडचणींसंदर्भात ह्यडेमोह्णदेखील झाला आहे. परीक्षेसाठी नियुक्त नागपूर येथील एजन्सीकडून तांत्रिक अडचणींवर तोडगा काढण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

परीक्षा २० ऑक्टोबरपासूनच
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अंतिम वर्ष व इतर सत्राच्या परीक्षा २० ऑक्टोबरपासून घेण्यात येईल, असा निर्णय परीक्षा मंडळाने बुधवारी घेतला आहे. मानव्यविद्या, वाणिज्यविद्या, सायन्स व अभियांत्रिकी आणि आंतरविद्या अशा चारही विद्याशाखांच्या परीक्षा यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार होणार आहे. केवळ १२ ते १९ ऑक्टोबर दरम्यानचे पेपर स्थगित करण्यात आले आहेत.
१२ ऑक्टोबरपासून ऑफलाईन, ऑनलाईन अशा दोनही पद्धतीच्या परीक्षांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, परीक्षेच्या आदल्या दिवशी तांत्रिक कारणे उद्भवल्याचे दिसून येताच या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. या परीक्षांचे व्यवस्थित नियोजनासाठी गत दोन दिवसांपासून कुलगुरू मुुरलीधर चांदेकर यांनी सूत्रे हाती घेतल्याचे दिसून आले.
कुलगुरूंच्या दालनात सलग दोन दिवस बैठकांचे सत्र सुरूच होते. प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांंच्याकडून परीक्षांबाबतची तयारी कुलगुरूंनी जाणून घेतली. ऑनलाईन परीक्षेत येणाऱ्या तांत्रिक अडचणींसंदर्भात ह्यडेमोह्णदेखील झाला आहे.
परीक्षेसाठी नियुक्त नागपूर येथील एजन्सीकडून तांत्रिक अडचणींवर तोडगा काढण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
परीक्षा सुरळीतवर भर
विद्यापीठ परीक्षा मंडळाची बुधवारी ऑनलाईन बैठक पार पडली. परीक्षा मंडळाचे अध्यक्ष कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी ऑनलाईन, ऑफलाईन परीक्षा ह्यसुरळीतह्ण होण्यासाठी प्राधान्याने भर दिला. एजन्सीला तांत्रक अडचणींवर मात करण्यासाठी काही सूचनादेखील देण्यात आल्यात. २० ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर यादरम्यान परीक्षांचे नियोजन करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. यावेळी प्र-कुलगुरु राजेश जयपूरकर, कुलसचिव तुषार देशमुख, परीक्षा मंडळाचे संचालक हेमंत देशमुख, अधिष्ठाता एफ.सी. रघुवंशी, अविनाश मोहरील, मनीषा काळे, बी.डब्ल्यू. निचित यांच्यासह प्राचार्य, शिक्षकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
५५० पेपरच्या तारखांमध्ये होणार बदल
विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाने ऑनलाईन बैठकीत १२ ते १९ ऑक्टोबर दरम्यान असलेले पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. २० ऑक्टोबर ते पुढे असलेले पेपर जैसे थे घेण्यात येतील, यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. १२ ते १९ ऑक्टोबर दरम्यान सुमारे ५५० पेपर पुढे घेण्यात येतील, अशी माहिती आहे. त्यानुसार अंतिम वर्ष व अन्य परीक्षांचे वेळापत्रक तयार करण्यात येत आहे.
१७ ऑक्टोबरपासून मॉक ड्रील
विद्यापीठाच्या चारही विद्याशाखांच्या परीक्षा २० ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. त्या अनुषंगाने ऑनलाईन परीक्षेच्या तयारीविषयी विद्यार्थ्यांना १७ ऑक्टोबरपासून ह्यमॉक ड्रीलह्ण होणार आहे. मोबाईल, डेस्कटॉप, लॅपटॉपवर ऑनलाईन परीक्षा देता येणार आहे. १७ ते १९ ऑक्टोबर असे तीन दिवस ह्यमॉक ड्रीलह्ण चालणार असल्याची माहिती कुलगुरू चांदेकर यांनी दिली.
२० ऑक्टोबरपासून परीक्षा सुरु होतील. परीक्षा मंडळाच्या बैठकीत बुधवारी निर्णय झाला. दोन दिवसात सुधारित वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. परीक्षेत अडचणी येणार नाही, याची दक्षता घेण्यात येत आहे.
- मुरलीधर चांदेकर, कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.