प्रजासत्ताकदिनी माजी सैनिकांना घरकरामधून सूट
By Admin | Updated: January 25, 2016 00:25 IST2016-01-25T00:25:25+5:302016-01-25T00:25:25+5:30
प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी रोजी ग्रामपंचायत कांडलीच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रजासत्ताकदिनी माजी सैनिकांना घरकरामधून सूट
ज्येष्ठांचा गौरव : कांडली ग्रामपंचायतीचा उपक्रम
परतवाडा : प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी रोजी ग्रामपंचायत कांडलीच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात प्रामुख्याने गावातील सर्व माजी सैनिकांच्या सत्काराचे आयोजन केले आहे. माजी सैनिकांच्या देशाच्या सीमेवर शत्रूपासूून देशाच्या संरक्षणाची जबाबदारी सांभाळत असताना त्यांनी केलेल्या कार्याचा आदर म्हणून गौरव करण्यात येणार आहे. सर्व माजी सैनिकांना यावर्षीपासूून ग्रामपंचायतीच्या घरकरातून सूट देण्याचा मानस आहे.
गावात नागरिकांना प्राथमिक सुविधांसोबतच त्यांना माजी सैनिकांच्या कार्याबाबत माहिती व ज्येष्ठ नागरिकांप्रती आदरभाव त्याचप्रमाणे माजी सरपंच व उपसरपंच यांनी केलेल्या कार्याची माहिती नागरिकांना व्हावी म्हणून सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ग्रामपंचायतीने या आठ महिन्यांच्या कार्यकाळात ग्रामस्वच्छता अभियान, पाणीपुरवठ्याचे नियोजन, नाली व्यवस्थापन, कचरा निर्मूलन, अतिक्रमण हटविणे, ग्रामपंचायत कार्यालयाचे सुशोभिकरण करून संरक्षक भिंत बांधून परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली. गावात एमआरजीएसच्या माध्यमातून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालयाचे सुशोभिकरण करून संरक्षक भिंंत बांधून परिसरात वृक्षलागवड करण्यात आली.
यासर्व बाबींचा अहवाल नागरिकांसमोर देण्यात येणार आहे. सोबतच पुढील प्रस्तावित कामात रस्ता दुभाजीकरण, मुख्य मार्गावरील खुल्या प्लॉटचे तारेचे कुंपण घालून सौंदर्यीकरण, मुख्य मार्गावरील रहदारीची कोंडी दूर करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)