शहरं
Join us  
Trending Stories
1
Lokmat Exclusive: ठाकरे मुंबई नक्कीच गमावतील, महापालिकांमध्ये निवडणुकोत्तर नवीन समीकरणे: CM देवेंद्र फडणवीस
2
आजचे राशीभविष्य : शुक्रवार ९ जानेवारी २०२६; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
3
ठाकरेंच्या गुहेत एकनाथ शिंदे यांची कठीण परीक्षा; भाजपा मदतीने तगडे आव्हान पार केले तर...
4
आंदोलकांचा इराणच्या राजधानीवर कब्जा! रात्रीच्या अंधारात सरकारी कार्यालये ताब्यात, तेहरानने हवाई क्षेत्र बंद केले...
5
“सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही, मी पाहिलेली आजवरची ही सर्वांत घाणेरडी निवडणूक”: अमित ठाकरे
6
…तर अमेरिका भारतावर ५०० टक्के टॅरिफ लादणार; डोनाल्ड ट्रम्प प्रशासन धक्का देण्याच्या तयारीत
7
ममतांच्या ‘वॉर रूम’वर ईडीचा पहाटे ६ वाजता छापा; प्रशांत किशोर स्थापित ‘आयपॅक’वर धाडी
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टार्गेटवर पुन्हा एकदा भारत; अमेरिका आंतरराष्ट्रीय सौर आघाडीतूनही बाहेर
9
महायुतीने चार प्रभाग निवडणुकीआधीच गमावले; बंडखोरीची केली चिंता, पण बसला मोठा फटका
10
काँग्रेस-वंचित युतीकडे ३६ जागांवर उमेदवारच नाही; काँग्रेसकडे २०, वंचितकडे १६ उमेदवारांचा अभाव
11
कोणाचे डिपॉझिट होणार जप्त? ९ पालिकांच्या तिजोरीत २ कोटी ६२ लाख जमा; मुंबईत १७०० उमेदवार
12
महायुतीत १५३ कोट्यधीश उमेदवार, चंदन शर्मा सर्वात श्रीमंत; सोनाली जाधवांकडे फक्त ४४ हजार
13
माजी आमदार, महापौरांच्या संपत्तीत झाली लक्षणीय वाढ; मालमत्तेचा विषय चर्चेचा ठरतोय
14
४ उमेदवारांनी निवडला समाजसेवा ‘व्यवसाय’; शिक्षणासह व्यावसायिक पार्श्वभूमीचे चित्र स्पष्ट
15
कार्यकर्त्यांना नाष्ट्याला कुठे तर्रीदार मिसळ-पाव, तर कुठे जिलेबी, फाफडा; दोन्ही वेळेला जेवणही!
16
महापालिका निवडणूक क्षेत्रात १५ जानेवारीला सुट्टी; राज्य सरकारकडून अधिसूचना जारी
17
महायुद्धाचे संकेत? 'या' २१ देशात प्रवास करू नका; अमेरिकन नागरिकांसाठी Travel Advisory जारी
18
बंडखोरांसह ३२ जणांचं ६ वर्षासाठी निलंबन; छुपा प्रचार करणाऱ्यांची गय करणार नाही, भाजपाचा इशारा
19
द बर्निंग ट्रेन! मुंबईत लोकलला भीषण आग; ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
20
"माझं खरं नाव आशिष नाही तर अब्दुल..."; लव्ह जिहादवरून नितेश राणेंचा पुन्हा प्रहार
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक मतदाराला प्रभागात चार मते द्यावेच लागणार; मग ते उमेदवार असो की 'नोटा'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 18:25 IST

Amravati : अमरावती महापालिकेत २२ प्रभागांत ६६१ उमेदवार मैदानात; ६ लाख ७७ हजार १८० मतदार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती :अमरावती महापालिकेत ८७ सदस्य निवडीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. चार सदस्य संख्येनुसार प्रभाग रचना मंजूर असल्याने प्रत्येक मतदाराला चार मते द्यावेच लागणार आहे. मग ते उमेदवार असो की 'नोटा'. ईव्हीएमचे बटण चार वेळा दाबून लोकशाहीचा हक्क बजावणे अनिवार्य आहे. त्याशिवाय मतदान केंद्रातून मतदारांना बाहेर पडता येणार नाही, अशी राज्य निवडणूक आयोगाची गाईडलाईन आहे.

महापालिका निवडणुकीत आरक्षणानुसार 'अ', 'ब', 'क', 'ड' यानुसार प्रभागात चार उमेदवारांना निवडून द्यायचे आहे. मात्र, प्रभागात बरेचदा काही मतदारांना त्यांच्या पसंतीनुसार उमेदवार नसतात, अशावेळी काहीजण दोन किंवा तीन उमेदवारांना मते देण्याचे कर्तव्य बजावतात. मात्र निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रत्येक मतदाराला चार मते द्यावे लागणार आहे. महापालिकेत ६ लाख ७७ हजार १८० मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील. 

तर चौथे बटण 'नोटा'चे दाबावे लागेल

प्रभागात चार उमेदवार असताना एखाद्या मतदाराला तीनच उमेदवारांना मते द्यायचे असल्यास चौथे 'नोटा'चे बटण दाबावे लागेल, त्याशिवाय मतदान पूर्ण होणार नाही, असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले. चारपैकी एकही उमेदवार मतदारांना योग्य वाटत नसल्यास अशावेळी 'नोटा' बटण दाबून मतदान करावे लागेल.

केंद्राध्यक्षांना मतदान प्रक्रिया पूर्ण करावी लागेल

एखाद्या मतदाराने पसंतीच्या उमेदवाराला मत देण्यास किंवा वरीलपैकी एकही नाही, 'नोटा'या पर्यायासमोरील बटन दाबण्यास नकार दिला तर मतदान केंद्राध्यक्षांनी बॅलेट युनिटवरील उमेदवारांचे नावासमोरील दिवे एखादा पुठ्ठा अथवा पुस्तक ठेवून झाकावेत. त्यानंतर मतदान केंद्रात उपस्थित सर्व मतदान प्रतिनिधींना बरोबर घेऊन त्यांच्या साक्षीने ज्या मतपत्रिकेवरील मतदान अपूर्ण राहिले, आहे, त्या मतपत्रिकेवरील 'वरीलपैकी एकही नाही' (नोटा) या पर्यायासमोरील बटण स्वतः दाबून मतदान प्रक्रिया पूर्ण करावी.

चौथ्या मताचे काय होणार?

ईव्हीएम मशीनद्वारे मतदान करताना मतदाराने तीनच उमेदवारांना मतदान केले आणि चौथे बटण हे 'नोटा' दाबले तर ते मत कोणत्याही उमेदवारांना झाले नसून ते गणले जात नाही. त्या मताची गणना "वरीलपैकी एकही नाही' अशी केली जाते. मतदान यंत्राच्या बॅलेट युनिटवर शेवटचे १६ वे 'नोटा' बटण ठेवले आहे.

मनपा निवडणूक प्रभाग रचनेनुसार

अमरावती महापालिकेची निवडणूक चार सदस्य प्रभाग रचनेनुसार होत आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराला चार मते देण्याचा अधिकार मिळाला आहे.

प्रभाग पद्धती कशासाठी अवलंब ?

वार्ड रचनेत मतदाराला एकच मत देण्याचे अधिकार होते. मात्र अमरावतीला महानगराचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे मतदारांना सुद्धा एका पेक्षा जास्त नगरसेवक निवडण्याचे अधिकार देण्यात आले आहे.

"राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर निवडणूक घ्यावी लागते. अमरावती मनपात चार सदस्य संख्यानुसार मतदान होणार आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराला चार मतदानाचा हक्क बहाल करण्यात आला आहे. चार मते देणे बंधनकारक आहे. किंबहुना मतदारांना रिंगणातील उमेदवार नापसंती असल्यास ते 'नोटा' बटण दाबून शकतात. मतदान केल्याशिवाय मतदाराला केंद्रातून बाहेर जाता येत नाही."- अनिल भटकर, निवडणूक निर्णय अधिकारी

English
हिंदी सारांश
Web Title : Amravati Voters Must Cast Four Votes, Even for NOTA.

Web Summary : Amravati voters must cast four votes in the upcoming municipal elections. If they don't like candidates, they can press NOTA. Otherwise, the presiding officer will cast the remaining vote for NOTA.
टॅग्स :Amravati Municipal Corporation Electionअमरावती महानगरपालिका निवडणूक २०२६AmravatiअमरावतीVotingमतदान