शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
3
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
4
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
5
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
6
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
7
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
9
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
10
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
11
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
12
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
13
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
14
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
15
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
16
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
17
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
18
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
19
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
20
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

अखेर श्वानसेवन प्रकरणी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 23:04 IST

हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील परप्रांतीय विद्यार्थ्यांनी फस्त केलेल्या श्वानाचे मोलच काय,

ठळक मुद्देआठवड्यानंतर जाग : अज्ञाताविरुद्ध फौजदारीची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील परप्रांतीय विद्यार्थ्यांनी फस्त केलेल्या श्वानाचे मोलच काय, अशी उलट विचारणा करणाºया राजापेठ पोलिसांनी अखेर आठवड्यानंतर गुन्हा दाखल केला आहे. 'विद्यार्जन अन् श्वानसेवन' या वृत्तमालिकेतून 'लोकमत'ने हा किळसवाणा आणि गंभीर प्रकार लोकदरबारी मांडल्यानंतर राजापेठ पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध का होईना, फौजदारी नोंदवून घेतली आहे.एचव्हीपीएमलगतच्या श्रीनाथवाडीतील हनुमान रंगराव शेळके यांचा पाळीव कुत्रा २९ जुलैला सकाळी ११ वाजताच्या सुमारास बेपत्ता झाला. शेळकेंनी परिसरात श्वानाची शोधाशोध चालविली. ३१ जुलैला सकाळी ८ वाजताच्या सुमारास त्यांना त्यांच्या पाळीव श्वानाचे अवशेष हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील परप्रांतीय विद्यार्थ्यांच्या वसतीगृह परिसरात आढळून आले.आपल्या पाळीव श्वानाला परप्रांतीय विद्यार्थ्यांनी कापून फस्त केल्याची शंका हनुमान शेळकेंना आली. त्यांनी या घटनेची तक्रार १ आॅगस्टला राजापेठ पोलीस ठाण्यात नोंदविली. परप्रांतीय विद्यार्थ्यांनी चक्क श्वान कापून खाल्याच्या घटनेने जिल्ह्याभरात खळबळ उडाली. मात्र, राजापेठ पोलिसांनी चौकशीच्या नावावर शेळकेंची उलटतपासणी केली. वसतिगृहात श्वान कापून खाल्याचे लक्षणे आढळली नाही, श्वानाला कापताना कोणी पाहिलेच नाही आणि त्या श्वानाचे मोलच काय, असा सवाल राजापेठचे ठाणेदार रामराव खराटे यांनी केला होता. खराटेचा हा अजब तर्क 'लोकमत'ने लोकदरबारी मांडले. त्यामुळे घटनेचे गांभीर्य उघड झाले. अज्ञात आरोपीविरुद्ध पोलिसांना भारतीय दंड विधानच्या कलम ४२९ अन्वये गुन्हा दाखल करावा लागला.साक्षीदारांचे बयानश्वान शिकार प्रकरणात रविवारी ठाणेदार सूर्यवंशी यांनी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील वसतिगृहात जाऊन संपूर्ण प्रकरणाची शहानिशा केली. पोलिसांनी श्रीनाथवाडीतील काही साक्षीदारांचे बयान नोंदविले.अशी आहे कलम ४२९प्राण्याला दुखापत करून अपंग करणे अथवा अविचाराने त्याला ठार मारून पशुपालकाचे नुकसान करणाºयाविरुद्ध भादंविचे कलम ४२९ अन्वये गुन्हा नोंदविला जातो. यात ५ वर्षे शिक्षेची तरतूद आहे.'त्या' श्वानाची किंमत एक हजार रुपयेश्वानाची महापालिकेत नोंद नसल्याचे व श्वानाला किंमत नसल्याने गुन्हा दाखल होणार नाही, असे खराटे म्हणाले होते. तथापि ठाणेदार किशोर सुर्यवंशी यांच्या आदेशान्वये रविवारी गुन्हा नोंदविण्यात आला व त्यात श्वानाची किंमत १ हजार रुपये दाखविण्यात आली.शेळकेंच्या तक्रारीची संपूर्ण शहानिशा केल्यानंतर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिलेत.- किशोर सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक, राजापेठ.