शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

कोविड रुग्णालय स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 5:00 AM

शहरात खबरदारी म्हणून प्रशासनाकडून विविध पावले उचलण्यात येत आहेत. त्यानुसार विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात हे स्वतंत्र कोव्हिड रुग्णालय स्थापित होत आहे. येथे १०० डॉक्टर, पारिचारिका, अटेंडंट, लॅब असिस्टंट, सुरक्षा रक्षक आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व स्टाफचा रुग्णालयाच्या परिसरातील वसतिगृहातच निवास असेल. दहा दिवसांसाठी हा स्टाफ नियुक्त असेल.

ठळक मुद्देविभागीय आयुक्तांची भेट : १०० आरोग्य अधिकारी, कर्मचारी नियुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी येथील विभागीय संदर्भ सेवा (सुपर स्पेशालिटी) रुग्णालयात स्वतंत्र कोविड रुग्णालय स्थापण्यात आले आहे. येथे सुमारे १०० आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. विभागीय आयुक्त पीयूष सिंह व जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी गुरुवारी येथे भेट देऊन विविध सूचना दिल्या.शहरात खबरदारी म्हणून प्रशासनाकडून विविध पावले उचलण्यात येत आहेत. त्यानुसार विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात हे स्वतंत्र कोव्हिड रुग्णालय स्थापित होत आहे. येथे १०० डॉक्टर, पारिचारिका, अटेंडंट, लॅब असिस्टंट, सुरक्षा रक्षक आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व स्टाफचा रुग्णालयाच्या परिसरातील वसतिगृहातच निवास असेल. दहा दिवसांसाठी हा स्टाफ नियुक्त असेल. त्यानंतर या सर्वांना १४ दिवसांसाठी क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात येईल. त्यानंतर आवश्यकता भासल्यास नवा स्टाफ नियुक्त होईल. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी पुरेशी साधनसामग्री उपलब्ध ठेवण्यात आली आहे.डॉक्टर, पारिचारिका, इतर कर्मचारी वर्ग निष्ठापूर्वक सेवा बजावत आहेत. या काळात जागरूक राहून स्वत:चीही काळजी घ्यावी. कुठलीही अडचण आल्यास तात्काळ कळवावे. साधनसामग्री, औषधसाठा सुसज्ज ठेवावा, शिफ्टनुसार अधिकारी- कर्मचाऱ्यांनी परस्पर समन्वय ठेवून कार्यवाही करावी, आदी निर्देश यावेळी देण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, डॉ. श्रीकांत महल्ले, डॉ. तुळशीदास भिलावेकर, डॉ. प्रशांत घोडाम यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, अधिसेविका, पारिचारिका, सुरक्षा रक्षक आदी यावेळी उपस्थित होते. राज्याच्या आरोग्य संचालक अर्चना पाटील यांनी हे रुग्णालय स्थापण्यासाठी निर्देश दिले होते१०० बेडचे रुग्णालयरुग्णालयात नियुक्त अधिकारी व कर्मचारी हे शिफ्टमध्ये सेवा देणार आहेत. तळमजल्यावर नोंदणी विभाग, पहिल्या मजल्यावर कोव्हिड-१९ संशयित तपासणी व विलगीकरण कक्ष १ व २ तसेच दुसऱ्या मजल्यावर रुग्ण कक्ष असेल. चौथ्या मजल्यावर आयसीयू कक्ष १ व २ निर्माण करण्यात आला आहे. हे रुग्णालय १०० खाटांचे असून, ६० खाटा कोरोना पॉझिटिव्ह, तर ४० खाटा संशयित रुग्णांसाठी आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल