शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणात समस्यांचा ‘एरर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2020 5:00 AM

नवीन शैक्षणिक वर्ष २६ जूनपासून सुरू झाले. मात्र, त्यापूर्वीच कोरोनाचा शिरकाव झाला. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणासाठी शिक्षण विभागासह विविध शाळांनी स्थानिक पातळीवर तयारी केली आहे. झूम अ‍ॅपच्या माध्यमातून शिक्षण विभाग शाळांना विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्याविषयी मार्गदर्शन करीत आहे. त्यानुसार जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याविषयी जिल्हा परिषद, पंचायत समिती स्तरावर नियोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देगावखेड्याचे चित्र; विविध अडचणींचा सामना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती/भातकुली : शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी ग्रामीण भागातील काही शाळांच्या शिक्षकांनी व्हॉट्सअ‍ॅप गु्रप तयार करून शिक्षण देणे सुरू केले आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिकणाऱ्या शेतमजूर, शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी कुठल्याही प्रकारची व्यवस्था अद्याप झालेली नाही. अनेक ठिकाणी मोबाईल रेंज, संगणकाचा अभाव, वीजपुरवठा वेळोवेळी खंडित होणे अशा विविध अडचणींना समोरे जावे लागत आहे. याशिवाय ऑनलाईन शिक्षणामुळे पालकांनाही आर्थिक भार सोसावा लागत आहे.नवीन शैक्षणिक वर्ष २६ जूनपासून सुरू झाले. मात्र, त्यापूर्वीच कोरोनाचा शिरकाव झाला. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणासाठी शिक्षण विभागासह विविध शाळांनी स्थानिक पातळीवर तयारी केली आहे. झूम अ‍ॅपच्या माध्यमातून शिक्षण विभाग शाळांना विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्याविषयी मार्गदर्शन करीत आहे. त्यानुसार जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याविषयी जिल्हा परिषद, पंचायत समिती स्तरावर नियोजन करण्यात आले आहे. शाळा सुरू झाल्यानंतर काय खबरदारी घ्यावी, विद्यार्थ्यांची सुरक्षा कशी करायची, पालकांचे प्रबोधन कसे करायचे, असा विविधांगी विचार-विनिमय सध्या सुरू आहे.शहरी भागासह ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. या शाळांमध्ये शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांमध्ये विविध घटकांतील पाल्यांचा समावेश आहे. शालेय विद्यार्थ्यांची दहावी ते बारावी वर्गापासून भविष्याची वाटचाल सुरू होते. ग्रामीण भागात जास्तीत जास्त शेतमजूर, शेतकरी वर्गातील मुले, मुली आहेत. त्यांनीदेखील सावलीतील नोकरी करावी, अशी पालकांची इच्छा असते. त्यामुळे ग्रामीण भागातही पालक आपल्या पाल्यांना चांगले शिक्षण मिळावे व तो एक चांगला शासकीय अधिकारी, कर्मचारी व्हावा, अशी अपेक्षा प्रत्येक पालकाला आहे. अशातच यंदा कोरोना महामारीच्या संकटामुळे मागील तीन महिन्यांपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. तेव्हापासून शाळा-महाविद्यालये बंद आहेत. अशातच आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली असली तरी अद्यापही शाळा-महाविद्यालये सुरू झालेली नाहीत. परिणामी शहरासह ग्रामीण भागातील अनेक शाळा विद्यार्थ्यांना व्हॉटसअ‍ॅप, झूमअ‍ॅपद्वारे मोबाइलवर शिक्षणाचे धडे देत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण सध्या मोबाईलवर सुरू आहे. या शिक्षणासाठी शेतकरी, शेतमजूर व अन्य पालकांना मोबाईल रिचार्जच्या खर्चाचा भारही सोसावा लागत आहे. या खर्चानंतरही अनेक गावात मोबाईलची रेंज मिळत नाही. मोबाईल बॅटरी डिस्चार्ज झाली, तर चार्जिंगसाठी वीजपुरवठा नसतो. याचवेळी आॅनलाईन शिक्षणाचा वर्ग असतो. यासारख्या अडचणींमुळे पाल्य यात सहभागी होऊ शकत नाही.अनेक अडचणीअनेक शाळा व्हॉट्सअ‍ॅप, झूम अ‍ॅपवर विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. मात्र, ग्रामीण भागात फारच वेगळी परिस्थिती आहे. संगणक, इंटरनेट, मोबाईल उपलब्ध नसल्याने आॅनलाइन शिक्षण देणे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे यावर योग्य पर्याय शोधणे आवश्यक आहे. गरिबांवर खर्चाचाही भार पडत असल्याचे पालक जयकृष्ण सहारे यांनी सांगितले.

टॅग्स :Educationशिक्षणonlineऑनलाइन