शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे अचलपूर पंचायत समितीचे प्रवेशद्वार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:18 IST

परतवाडा : वाढत्या कोरोना रुग्णांमुळे अचलपूर तालुक्यातील परिस्थिती स्फोटक बनली असून, अचलपूर पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीचे मुख्य प्रवेशद्वार कुलूपबंद ...

परतवाडा : वाढत्या कोरोना रुग्णांमुळे अचलपूर तालुक्यातील परिस्थिती स्फोटक बनली असून, अचलपूर पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीचे मुख्य प्रवेशद्वार कुलूपबंद करण्यात आले आहे.

अभ्यागतांना निवेदनासह अधिकाºयांना भेटण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यांचे निवेदन इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या एका खिडकीतून स्वीकारले जाणार असल्याच्या सूचना त्याठिकाणी लावण्यात आल्या आहेत.

पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी व अतिरिक्त बाल विकास अधिकारी कोरोना संक्रमित निघाले आहेत. सोबतच गटशिक्षणाधिका०यांच्या कक्षाची दारेही बंद होती. पंचायत समिती कार्यालयात सर्वत्र शुकशुकाट पसरलेला होता. मेळघाट (प्रादेशिक) वनविभाग परतवाडा येथील विभागीय कार्यालयातीलही दोन कर्मचारी कोरोना संक्रमित निघाले आहेत.

ग्रामीण भागातही कोरोना जोरात

अचलपूर-परतवाडासह लगतच्या परिसरात १५ फेब्रुवारीला एकाच दिवशी ४० रुग्ण कोरोना संक्रमित निघाले आहेत. यात गोंडविहीर, इसेगाव, गौरखेडा कुंभी, बोरगाव तळणी, वडूरा, जवर्डी, येवता, देवमाळी, कांडली, वासनी खुर्द येथील कोरोना रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यातील अर्ध्याहून अधिक गावांमध्ये कोरोना रुग्ण निघाले असून, आजही ते निघत आहेत. यात नव्या गावातील कोरोना रुग्णांचाही अधिकच भर पडत आहे. देवमाळी, कांडली तर ‘हॉट स्पॉट’ बनले आहेत.

जुळ्या शहरांतील हे भाग बनले ‘हॉट स्पॉट’

अचलपूर शहरातील चावलमंडी, बिलनपुरा, मिल कॉलनी, अभिनव कॉलनी, देवळी, गांधी पूल, बुंदेलपुरा तसेच परतवाडा शहरातील सदर बाजार, टिळक चौक, पेन्शनपुरा, सिव्हिल लाईन, ब्राम्हणसभा, पिंपरकर मार्ग परिसरातील परिस्थिती स्फोटक बनली आहे. शहरात ताप, खोकला, सर्दीचे रुग्ण वाढले आहेत. वाढत्या रुग्णांचा परिणाम बाजारपेठेवरही जाणवायला लागला आहे. दोन दिवसांपासून बाजारपेठेतील वर्दळ मंदावली आहे. कोरोना रुग्णांमुळे चिंता वाढली आहे.

पर्यायी व्यवस्था

कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता ट्रामा केअर युनिटमध्ये नव्याने पंधरा बेड लावण्यात आले आहे. कोविड रुग्णालय अचलपूर मधील ३५ आणि ट्रामामधील १५ अशा ५० बेडची व्यवस्था कार्यान्वित आहेत. हे सर्व बेड फुल्ल आहेत. याव्यतिरिक्त आंबेडकर वसतिगृहात व बुरडघाट येथील आश्रमशाळेत कोविड सेंटर उघडण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे.

—————————