वरातीचा उत्साह; रूग्णांचे हाल

By Admin | Updated: May 18, 2014 23:13 IST2014-05-18T23:13:06+5:302014-05-18T23:13:06+5:30

जिल्हा स्त्री रुग्णालयासमोर उद्भवणार्‍या वाहतुकीच्या समस्येमुळे या रूग्णालयात येणार्‍या रूग्णवाहिकांना सुद्धा ‘ट्रॅफिक जाम’चा सामना करावा लागतो.

The enthusiasm of advertising; Patients' condition | वरातीचा उत्साह; रूग्णांचे हाल

वरातीचा उत्साह; रूग्णांचे हाल

अमरावती : जिल्हा स्त्री रुग्णालयासमोर उद्भवणार्‍या वाहतुकीच्या समस्येमुळे या रूग्णालयात येणार्‍या रूग्णवाहिकांना सुद्धा ‘ट्रॅफिक जाम’चा सामना करावा लागतो. यामुळे आपत्कालीन स्थितीत डफरीनमध्ये प्रसूतीसाठी दाखल होणार्‍या महिलांच्या जीवाला धोका संभवतो. डफरीन रूग्णालयासमोरील अस्ताव्यस्त वाहतुकीमुळे रूग्णालयात रूग्णांना घेऊन येणार्‍या रूग्णवाहिका कितीतरी वेळ प्रवेशद्वारासमोरच ताटकळत राहतात. येथे वाहतुकीचा खोळंबा होण्याची स्थिती दररोजच निर्माण होते. कधीकधी रूग्णाहिकांमध्ये अत्यवस्थ रूग्णही असतात. अशा वेळी अनुचित घटना घडू शकते. दररोज हा प्रकार घडत असताना वाहतूक पोलीस मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. डफरीनचे कर्मचारीही याबाबत गंभीर नाहीत. ही व्यवस्था सुधारण्यात यावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. जिल्हा स्त्री रुग्णालयासमोरील मार्गावर विमा कंपनी, विद्युत कंपनीचे कार्यालय आहे. याच मार्गावर अनेक खासगी रुग्णालयेसुध्दा आहेत. हा मार्ग समोरच्या वस्तीकडेही गेला आहे. त्यामुळे या मार्गावर सतत नागरिकांची वर्दळ असते. डफरीनच्या प्रवेशद्वासमोरच वळण रस्ता असल्याने ये-जा करणार्‍यांना दररोज विचित्र वाहतुकीचा सामना करावा लागतो. शेकडो वाहनांसोबतच जिल्हा स्त्री रुग्णालयातील रूग्णवाहिकांची वर्दळही सुरु असते. विचित्र वाहतुकीचा फटका या रूग्णवाहिकांना हमखास बसतो.

Web Title: The enthusiasm of advertising; Patients' condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.