अभियांत्रिकीचे प्रवेश आजपासून

By Admin | Updated: June 5, 2017 00:04 IST2017-06-05T00:04:36+5:302017-06-05T00:04:36+5:30

सीईटीचा निकाल जाहीर होताच अभियांत्रिकी पदवी प्रवेशाला सोमवार ५ जूनपासून सुरूवात होणार आहे.

Engineering from today | अभियांत्रिकीचे प्रवेश आजपासून

अभियांत्रिकीचे प्रवेश आजपासून

तीन फेऱ्या : १९ जून रोजी पहिली यादी
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सीईटीचा निकाल जाहीर होताच अभियांत्रिकी पदवी प्रवेशाला सोमवार ५ जूनपासून सुरूवात होणार आहे. प्रवेशाचे वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयाच्या सामाईक प्रवेशपूर्व परीक्षा सेलमार्फत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. यावर्षी तीनही फेऱ्या होतील. त्याचबरोबर शासकीय आणि अनुदानित महाविद्यालयातील रिक्त राहणाऱ्या जागांसाठी ज्यादा फेऱ्या घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
इयत्ता बारावी आणि सीईटीचे निकाल जाहीर झाल्याने आता अभियांत्रिकी प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. सोमवारपासून ही प्रवेशप्रक्रिया प्रारंभ होईल. यासाठी तीन प्रवेशफेऱ्या होणार आहेत. १७ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना आॅनलाईन अर्ज करता येतील. १७ जूनअखेर विद्यार्थ्यांना गुणपत्रकांची छाननी अर्ज स्वीकृती केंद्रात जाऊन करावी लागेल.
विभागात ११,४३० जागा
अमरावती : १९ जून रोजी पहिली यादी जाहीर होईल. या यादीवर आक्षेप नोंदविल्यास २० व २१ जून अशी दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. २२ जून रोजी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. २३ ते २६ जूनदरम्यान अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. २८ जून रोजी प्रवेशाची पहिली यादी जाहीर केली जाणार आहे. ५ ते ८ जुलै अखेर दुसरी विकल्पफेरी होईल. १० जुलै रोजी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची दुसरी यादी लागणार आहे. तिसऱ्या फेरीसाठी रिक्त असणाऱ्या जागांची माहिती १६ जुलै रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. तिसऱ्या फेरीसाठी विकल्पफेरीत बदल करण्याची मुदत १९ जुलै अखेरपर्यंत आहे. २१ जुलै रोजी प्रवेशाची तिसरी यादी जाहीर होईल.अमरावती विभागात २८ महाविद्यालये व ११४३० जागा आहेत.
प्रवेश अर्ज सादर करणे, कागदपत्रांची छाननी- ५ ते १७ जून, प्रवेशाची कच्ची गुणवत्ता यादी- १९ जून, पहिली गुणवत्ता यादी- २२ जून, पहिल्या फेरीसाठी रिक्त जागांची माहिती- २२ जून, अर्जात विकल्प भरण्याची मुदत- २३ ते २६ जून, प्रवेश मिळालेल्यांची पहिली यादी- २८ जून, दुसरी विकल्प फेरी- ५ ते ८ जुलै, प्रवेश मिळालेल्यांची दुसरी यादी- १० जुलै, तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा- १६ जुलै, विकल्प बदलण्याची मुदत- १६ ते १९ जुलै, प्रवेश मिळाल्याची तिसरी यादी- २१ जुलै.

Web Title: Engineering from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.