पर्यटन नगरीला अतिक्रमणाचा विळखा: पालिकेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:13 IST2021-04-27T04:13:58+5:302021-04-27T04:13:58+5:30
चिखलदरा : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळाला अतिक्रमणाने विळखा घातला आहे पालिकेच्या पथकाने सोमवारी सकाळी ११ वाजता मुख्याधिकारी ...

पर्यटन नगरीला अतिक्रमणाचा विळखा: पालिकेची कारवाई
चिखलदरा : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळाला अतिक्रमणाने विळखा घातला आहे पालिकेच्या पथकाने सोमवारी सकाळी ११ वाजता मुख्याधिकारी सुधाकर पानझडे यांच्या नेतृत्वात अतिक्रमण हटाओ मोहीम राबविली. दुसरीकडे शासकीय जागेवर अतिक्रमण करून लाखो रुपयांत पुन्हा नव्याने दुसऱ्या जागेवर अतिक्रमण करण्याचा व्यवसाय फोफावल्याचे चित्र आहे.
चिखलदरा पर्यटनस्थळावर पालिका अंतर्गत असलेल्या शासकीय जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाचा सपाटा स्थानिकांसह बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांनी लावला आहे. एकमेकांच्या नातेवाईकांना बोलावून शासकीय जागेवर अतिक्रमण करायचे व लागलीच ती जागा लाखो रुपयात देऊन पुन्हा नव्याने दुसऱ्या जागेवर अतिक्रमण करण्याचा पायंडा सुरू आहे. त्यामुळे पर्यटन नगरीची अवस्था अतिक्रमण नगरी, अशी झाली आहे.
याअनुषंगाने नव्याने अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध नगरपालिकेच्यावतीने कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे. सोमवारी मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे यांच्या नेतृत्वात शाखा अभियंता ऐश्वर्या मालधुरे, प्रमोद वानखडे, राजेश अटवर्धन, अनिकेत लहाने, सचिन चावके, गिरीश देशमुख, प्रदीप जोशी, दुर्गेश पाल, गणेश चव्हाण, शेख शहजाद या पथकाने ही कारवाई केली. अतिक्रमण हटाओ मोहिमेत गिरिस्थान कॉलनी परिसरातील नाल्यातलग तीन घरे कच्च्या स्वरूपात बांधण्यात आली होती व काहींनी जागा घेरून ठेवली होती. ते सर्व अतिक्रमण काढून साहित्य जप्त करण्यात आले.