महसूल जागेवरील अतिक्रमण हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 21:38 IST2018-08-24T21:37:34+5:302018-08-24T21:38:09+5:30
ई-क्लासची जागेवरील अतिक्रमण शुक्रवारी पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आले. लीजवर घेतलेली जागा विक्री करून अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आल्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने हे अतिक्रमण हटविण्यात आले. यावेळी नागरिकांच्या विरोधाला प्रशासनाला सामोरे जावे लागले.

महसूल जागेवरील अतिक्रमण हटविले
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ई-क्लासची जागेवरील अतिक्रमण शुक्रवारी पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आले. लीजवर घेतलेली जागा विक्री करून अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आल्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने हे अतिक्रमण हटविण्यात आले. यावेळी नागरिकांच्या विरोधाला प्रशासनाला सामोरे जावे लागले.
ई-क्लासची जागा वीटभट्टीसाठी दिगंबर गडपाले यांना लीजवर देण्यात आली होती. मात्र, त्या जागेत प्लॉट पाडून जागा विक्री केल्याच्या तक्रारी महसूल विभागाला प्राप्त झाल्या. या अनुषंगाने झालेल्या चौकशीनंतर जिल्हाधिकाºयांनी महसूल विभागाला अतिक्रमण तोडण्याचे आदेश दिले. त्यानुसार शुक्रवारी महसूल विभागाचे तहसीलदार गजेंद्र मालठाणे, नायब तहसीलदार संजय कडू, मंडल अधिकारी यशवंत चतुर, संजय ढोक, तलाठी श्रीरत्न मोहोड, सुनिल भगत, केदारनाथ जोशी, पाटकर, काळबांडे, शेंगावकर, मोरे, वर्षा सोळंके, साबळे, कोतवाल अंशीकर, संध्या इंगळे यांच्या उपस्थितीत, पोलीस उपायुक्त निवा जैन यांच्या मार्गदर्शनात, पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या नेतृत्वात ५० हून अधिक पोलीस बंदोबस्ताला होते. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने अतिक्रमणातील सहा पक्के बांधकाम, दहा कच्ची घरे व झोपड्या हटवून साहित्य जप्त केले. अतिक्रमण हटविताना परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. यावेळी अतिक्रमणधारकांचा विरोधात प्रशासकीय अधिकाºयांना सहन करावा लागला. पोलिसांच्या बंदोबस्तामुळे अतिक्रमण हटविण्यात यश मिळविले.