केंद्रप्रमुखांच्या कार्यालयात फळविक्रेत्यांचे अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:17 IST2020-12-05T04:17:52+5:302020-12-05T04:17:52+5:30

दोन खोल्या धूळखात : सर्व शिक्षा अभियान अंजनगांव बारी : सर्व शिक्षा अभियानांतर्गत बांधण्यात आलेल्या येथील शाळा केंद्रप्रमुखांच्या कार्यालयात ...

Encroachment of fruit sellers in the office of the head of the center | केंद्रप्रमुखांच्या कार्यालयात फळविक्रेत्यांचे अतिक्रमण

केंद्रप्रमुखांच्या कार्यालयात फळविक्रेत्यांचे अतिक्रमण

दोन खोल्या धूळखात : सर्व शिक्षा अभियान

अंजनगांव बारी : सर्व शिक्षा अभियानांतर्गत बांधण्यात आलेल्या येथील शाळा केंद्रप्रमुखांच्या कार्यालयात फळविक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे.

येथील कन्या शाळा, उर्दू शाळा व केंद्रप्रमुख कार्यालयासाठी तीन खोल्यांचे बांधकाम दहा वर्षांपूर्वी करण्यात आले. मात्र, त्या खोल्यांची अवस्था गंभीर असून, दरवाजे, खिडक्यांची मोडतोड झाली आहे. तेथे वर्ग भरत नसल्याने व केंद्रप्रमुख येत नसल्याने फळविक्रेत्यांनी तेथे बस्तान मांडले आहे. जे परप्रांतीय लोक येथे व्यवसाय करण्यास आले होते. लॉकडाऊनच्या काळात माणुसकी म्हणून त्यांना स्थानिक ग्रामपंचायतने तेथे राहण्यास मुभा दिली. मात्र, नऊ महिन्यानंतरही त्यांनी आपले बस्तान तेथून हलविले नाही. अमरावतीच्या बीडीओंना कुठलीही सूचना न देता शिक्षण विभागाच्या अंतर्गत अखत्यारीत असलेल्या शाळा दिल्या कशा, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

२१ लाखांचा खर्च वाया

शासनाने सर्व शिक्षा अभियानांतर्गत तीन खोल्यांच्या बांधकामावर सुमारे २१ लाख रुपये खर्च केले. त्या खोल्यांचा विद्यार्थ्यांना कोणताही लाभ न होता त्या जीर्ण अवस्थेत पडल्या आहेत. या बांधलेल्या शाळाखोल्या शासनाने उपयोगात आणाव्यात आणि ज्यांनी त्या वर्गखोल्या दिल्या, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

----

Web Title: Encroachment of fruit sellers in the office of the head of the center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.