वरूडमध्ये अतिक्रमण निर्मूलन मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:17 IST2020-12-05T04:17:41+5:302020-12-05T04:17:41+5:30
वरूड : स्थानिक नगर परिषद हद्दीत नगरपलिकेच्यावतीने अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविली जाणार आहे. अतिक्रमितांनी आपले अतिक्रमण स्वत:हून काढावे, अन्यथा ...

वरूडमध्ये अतिक्रमण निर्मूलन मोहीम
वरूड : स्थानिक नगर परिषद हद्दीत नगरपलिकेच्यावतीने अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविली जाणार आहे. अतिक्रमितांनी आपले अतिक्रमण स्वत:हून काढावे, अन्यथा ते पालिका काढेल, पुढील नुकसानास पालिका जबाबदार राहणार नाही, अशी जाहीर मुनादी शहरात देण्यात आली आहे. पोलिसांच्या सहकार्याने ही मोहीम राबविली जाईल.
शहरातील राष्ट्रीय महामार्ग, ॲप्रोच रोड, रिंग रोड, मेन रोड तसेच शहरातील मुख्य चौकात अतिक्रमण वाढले आहे. अनेक दुकानदारांनी दुकानासमोर टिन शेड लावून वर्दळीची जागा वा फुटपाथची जागा बळकावली आहे. त्या पार्श्वभूमीवर रहदारीस अडथळा ठरणारे अतिक्रमण व रस्ते खुले करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी ही मोहीम राबवित असल्याची माहिती मुख्याधिकारी रवींद्र पाटील यांनी दिली.