अमरावतीत ९६ कैद्यांना इमर्जन्सी पॅरोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 05:01 IST2020-05-15T05:00:00+5:302020-05-15T05:01:44+5:30

गृहविभागाचे उपसचिव एन.एस. कराड यांनी ८ मे २०२० रोजी अधिसूचना जारी करून कैद्यांना इमर्जन्सी ४५ दिवसांचे पॅरोलवर सुटी देण्याबाबत गाइडलाइन दिली आहे. कोरोना कारागृहात शिरू नये, यासाठी गृह विभागाने उपाययोजना चालविल्या आहेत. न्यायालयाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वाचा आधारानुसार समिती गठित करण्यात आल्या आहेत.

Emergency parole for 96 prisoners in Amravati | अमरावतीत ९६ कैद्यांना इमर्जन्सी पॅरोल

अमरावतीत ९६ कैद्यांना इमर्जन्सी पॅरोल

ठळक मुद्दे‘कोरोना’ इफेक्ट : नऊ मेपासून संचित रजेवर सोडण्याची प्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्यामुळे कारागृहात बंदीस्त असलेल्या कैद्यांना कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ४५ दिवसांचा इमर्जन्सी पॅरोल मंजूर केला जात आहे. त्याअनुषंगाने गत पाच दिवसांपासून गृह विभागाच्या निर्देशांनुसार येथील मध्यवर्ती कारागृहात ९६ कैद्यांना बॉण्डवर सोडण्यात आले आहे.
गृहविभागाचे उपसचिव एन.एस. कराड यांनी ८ मे २०२० रोजी अधिसूचना जारी करून कैद्यांना इमर्जन्सी ४५ दिवसांचे पॅरोलवर सुटी देण्याबाबत गाइडलाइन दिली आहे. कोरोना कारागृहात शिरू नये, यासाठी गृह विभागाने उपाययोजना चालविल्या आहेत. न्यायालयाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वाचा आधारानुसार समिती गठित करण्यात आल्या आहेत. ज्या कैद्यांना सात वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली, ज्यांचे कारागृहात वर्तन चांगले आहे, ज्या गुन्ह्यात आहे, ते सुधारण्याच्या मार्गावर आहेत, अशा बंदीवानांना कारागृहात बॉण्डवर इमर्जन्सी पॅरोल मंजूर केला जात आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्यामुळे एकत्र राहत असलेल्या कारागृहातील बंदी बाहेर काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ८ मे रोजी आदेश धडकताच ९ मेपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. रविवारपासून कैद्यांना सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गत पाच दिवसांत ९६ कैद्यांना इमर्जन्सी पॅरोलवर सोडण्यात आलेले आहेत. गंभीर गुन्ह्यात सात वर्षांपेक्षा अधिक काळ शिक्षा भोगत असलेल्या बंदीजनांना याचा लाभ मिळणार नाही, असे गृह विभागाने स्पष्ट केले आहे.

चार महिलांसह ९२ पुरूष कैद्यांना लाभ
सात वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या बंदीजनांना इमर्जन्सी पॅरोल मंजूर करण्यात येत आहे. त्यानुसार बंदीजनांची यादी तयार करण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. गत पाच दिवसांपासून ९६ कैदी पॅरोलवर सोडले आहेत. यात चार महिला व ९२ पुरूष बंदीजनांचा समावेश असल्याची माहिती कारागृह अधीक्षक रमेश कांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

Web Title: Emergency parole for 96 prisoners in Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jailतुरुंग