विविध मागण्यांसाठी एकवटले प्राथमिक शिक्षक
By Admin | Updated: March 15, 2016 00:36 IST2016-03-15T00:36:11+5:302016-03-15T00:36:11+5:30
शासनाच्या अन्याय कारक धोरणास विरोध करण्यासाठी सोमवार १४ मार्चला जिल्हाकचेरी समोर प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

विविध मागण्यांसाठी एकवटले प्राथमिक शिक्षक
अमरावती : शासनाच्या अन्याय कारक धोरणास विरोध करण्यासाठी सोमवार १४ मार्चला जिल्हाकचेरी समोर प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी किरण गित्ते, सीईओ सुनील पाटील यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.
वीस पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करू नये, १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर सेवेत आलेल्या सर्वाना १९८२ ची मुळ सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करावी, परिभाषित अंशदान पेंशन योजना बंद करावी, २८ आॅगस्ट २०१५ च्या शासन निर्णयानुसार संच मान्यता मंजूर करावी, सहा.शिक्षक, विषय पदवीधर शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या जागा विनाविलंब भराव्यात, सर्व प्रकारच्या आंतरजिल्हा बदलीचे आदेश निर्गमित करावे, शालार्थ वेतन प्रणालीत सुधारणा व्हावी व शिक्षकांना १ तारखेला मासीक वेतन मिळावे, आदी मागण्यासाठी निवेदन सोपविले आहे. यावेळी राज्य उपाध्यक्ष चंद्रकांत पुसतकर, जिल्हाध्यक्ष गोकुलदास राऊत, अशोक पारडे, विजय पुसलेकर, प्रवीणा कोल्हे, प्रसिध्दीप्रमुख राजेश सावरकर, अलका देशमुख, मनोज ओळंबे, छोटूसिंग सोमवंशी, प्रमोद ठाकरे, अजय पवार, प्रफुल्ल शेंडे, सुदाम राठोड, मधुकर चव्हाण, अर्चना सावरकर,व पदाधिकारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)