एप्रिलपासून नळावरील वीज पंप होणार जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 06:00 IST2020-03-04T06:00:00+5:302020-03-04T06:00:15+5:30
नळाला विद्युत पंप लावण्यात येत असल्याने बहुतेक नागरिकांच्या नळाला पाणी येत नसल्याचा आरोप करीत नगरसेवक चेतन पवार यांनी महासभा व महापौर बैठकीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणवर आगपाखड केली होती. त्याच्या अनुषंगाने महापौर चेतन गावंडे यांच्या अध्यक्षतखाली झालेल्या बैठकीत शहरात ज्या भागात पाणी पोहोचत नाही, अशा भागाची यादी करण्याचे निर्देश मजीप्रा अधिकाऱ्यांना दिले होते.

एप्रिलपासून नळावरील वीज पंप होणार जप्त
अमरावती : महानगरात एप्रिलपासून नियमित पाणीपुरवठा सुरू होणार आहे. नवीन टाक्या व जलवाहिन्यांची कामे पूर्णत्वाला आली आहे. त्यामुळे पूर्ण दाबाने पाणी नागरिकांना मिळणार आहे. परिणामी नळाला विद्युत पंप लावण्याची गरज भासणार नाही. तरीही हा प्रकार सुरू राहिल्यास पंप जप्ती मोहीम सुरू करण्याची ग्वाही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) च्या अधिकाऱ्यांनी सोमवारी महापालिका शहर अभियंत्यांच्या बैठकीत दिली.
नळाला विद्युत पंप लावण्यात येत असल्याने बहुतेक नागरिकांच्या नळाला पाणी येत नसल्याचा आरोप करीत नगरसेवक चेतन पवार यांनी महासभा व महापौर बैठकीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणवर आगपाखड केली होती. त्याच्या अनुषंगाने महापौर चेतन गावंडे यांच्या अध्यक्षतखाली झालेल्या बैठकीत शहरात ज्या भागात पाणी पोहोचत नाही, अशा भागाची यादी करण्याचे निर्देश मजीप्रा अधिकाऱ्यांना दिले होते. त्या विषयाची माहिती शहर अभियंता रवींद्र पवार यांनी मजीप्राच्या उपस्थित तिन्ही उपअभियंत्यांना दिली.
चर्चेदरम्यान ज्या भागात नळाला पाणी सोडण्यात येते, त्या भागाचा विद्युत पुरवठा खंडित करण्याचा मुद्दा आला. ही सूचना व्यवहार्य नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, ज्या दिवशी लाइन नसते, त्या दिवशी सर्व भागांतील नागरिकांना मुबलक व पूर्ण दाबाने पाणी मिळते, असे निरीक्षण अभियंत्यांनी यावेळी सांगितले. नियमित पाणीपुरवठा १ एप्रिलपासून सुरू होण्याची शक्यता असल्याने नागरिकांना पंप लावण्याची गरज भासणार नाही, मात्र, असा प्रकार घडल्यास पंप जप्तीची मोहीम हाती घेणार असल्याचे मजीप्रा अधिकाºयांनी सांगितले.
पाण्याच्या टाकीची जोडणी करा
अमृत योजनेंतर्गत पाण्याच्या टाकीची जोडणी करण्यात आलेली नाही; काही भागांतील पाण्याच्या टाकीचे बांधकाम अद्यापही पूर्ण नसल्याची बाब विलास इंगोले यांनी महापौरांच्या बैठकीत स्पष्ट केली होती. महादेवखोरी परिसर अमृत योजनेत समाविष्ट नसल्यामुळे या ठिकाणी पाण्याची टाकी बांधण्यात यावी, असे सदस्यांनी सांगितले. म्हाडा कॉलनीतील नागरिकांना नळजोडणी देण्याची मागणी समोर आली आहे.