२३ हजार ग्राहकांकडे ११ कोटींची वीज देयके थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:34 IST2020-12-04T04:34:58+5:302020-12-04T04:34:58+5:30

पान २ साठी धामणगाव रेल्वे : तालुक्यात २३ हजार वीज ग्राहकांकडे कोरोना काळातील थकीत असलेल्या ११ ...

Electricity payments of Rs 11 crore due to 23,000 customers | २३ हजार ग्राहकांकडे ११ कोटींची वीज देयके थकीत

२३ हजार ग्राहकांकडे ११ कोटींची वीज देयके थकीत

पान २ साठी

धामणगाव रेल्वे : तालुक्यात २३ हजार वीज ग्राहकांकडे कोरोना काळातील थकीत असलेल्या ११ कोटी ७८ लाख रुपये वसुलीसाठी महावितरण कंपनीने कंबर कसली आहे. आता प्रत्येक गावात वसुलीसाठी जनसंपर्क अभियान राबविले जाणार आहे. पाच हजारांपेक्षा अधिक वीज देयक भरणाऱ्या ग्राहकांचे महावितरणतर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येणार आहे.

तालुक्यात सात वितरण केंद्र आहेत. धामणगाव शहरात ४ हजार ६१० ग्राहक असून त्यांनी आजपावेतो २ कोटी ८४ लाख रुपयांचा भरणा केलेला नाही. धामणगाव ग्रामीण भाग एकमध्ये २,९७० ग्राहकांकडे १ कोटी ४० लाख रुपये थकीत आहे. ग्रामीण दोन परिसरात ३,१११ ग्राहकांनी लॉक डाऊनच्या काळात आपल्याकडे थकीत असलेली १ कोटी २८ लक्ष रुपये रक्कम भरली नाही. तळेगाव दशासर भागात ३, ६०० ग्राहकांकडे १ कोटी ६१ लाख, तर मंगरूळ दस्तगीर एक भागात २,९०० ग्राहकांकडे १ कोटी २६ लाख, मंगरूळ दस्तगीर ग्रामीण दोन मध्ये २,५८४ ग्राहकांकडे १ कोटी १० लाख, तर अंजनसिंगी केंद्रात ३,९५० ग्राहकांकडे १ कोटी ६२ लाख रुपये थकीत आहेत. २९२ औद्योगिक ग्राहकांकडे ६३ लाख रुपये थकीत आहेत.

जागरुक ग्राहक

तालुक्यातील आठ हजार ग्राहकांनी नियमित, तर १५ हजार ग्राहकांनी टप्प्याटप्प्याने ९ कोटी ६३ लाख रुपये इतके वीजदेयक भरले आहेत. घरगुती औद्योगिक व वाणिज्य ग्राहकांनी आपल्या वीजबिलाची थकीत रक्कम भरणे गरजेचे आहे.

- यू. के. राठोड,

उपविभागीय अभियंता, महावितरण

-----------

Web Title: Electricity payments of Rs 11 crore due to 23,000 customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.