शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

कुंपणाला वीज प्रवाह; शेतकऱ्यावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 11:50 PM

वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेताच्या कुंपणाला वीज प्रवाह सोडल्याप्रकरणी महावितरणने शुक्रवारी एका शेतकऱ्यावर गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देजंगलालगतच्या शेतांची तपासणी : वनविभाग, महावितरणची संयुक्त कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेताच्या कुंपणाला वीज प्रवाह सोडल्याप्रकरणी महावितरणने शुक्रवारी एका शेतकऱ्यावर गुन्हा दाखल केला. देविदास उंकडराव ठाकरे (रा. बोडणा) असे शेतकऱ्याचे नाव आहे.राखीव वनक्षेत्रालगत शेतकरी कुंपणाला वीज प्रवाह सोडून शेतातील पिकांचे संरक्षण करतात. मात्र, शेतकºयांची ही शक्कल वन्यप्राण्यांच्या जिवावर बेतते. काही दिवसांपूर्वी वाघ, बिबट्याचे कुंपणाच्या वीज प्रवाहाने नाहक बळी गेले. त्यामुळे जंगलाशेजारील शेतात कुंपणाला वीज प्रवाह सोडू नये, असे फर्मान शासनाने काढले आहेत. शेताच्या कुंपणाला वीज प्रवाहविरोधात धडक कारवाईची जबाबदारी वनविभाग आणि महावितरण कंपनीकडे सोपविली. त्यानुसार पोहरा वनक्षेत्रांतर्गत शेत कुंपणाची तपासणी केली असता, बोडणा येथे कुंपणाला वीज प्रवाह सोडण्यात आल्याचे चमूच्या लक्षात आले. महावितरणचे सहायक अभियंता अतुल बोकाडे, पोहºयाचे वनपाल विनोद कोहळे यांच्या मार्गदर्शनात घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. विद्युत कायदा २००३ (सुधारित २००५) कलम १३५ अन्वये देविदास ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळाचा पंचनामा करून वीज तार, बल्ब आदी साहित्य जप्त करण्यात आले.उपवनसंरक्षक हेमंत मीणा यांच्या आदेशानुसार वडाळीचे वनपरिक्षेत्र अधिकारी हरिश्चंद्र पडगव्हाणकर यांच्या मार्गदर्शनात शेत कुंपण तपासणी कारवाई निरंतरपणे सुरू राहील, असे वनविभागाने स्पष्ट केले. सुधीर खुजावरे, पी.बी. शेंडे, बाबूराव येवले, आर. के. खडसे, अनिरा उके, पी.टी. आखरे आदी वनकर्मचाऱ्यांनी ही मोहीम राबविली.