ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचे वारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:31 IST2020-12-11T04:31:39+5:302020-12-11T04:31:39+5:30
पान २ राजुरा बाजार : वरूड तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपला असून, शासनाने अशा सर्व ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नेमणूक केली ...

ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचे वारे
पान २
राजुरा बाजार : वरूड तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपला असून, शासनाने अशा सर्व ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नेमणूक केली आहे. मात्र, कोरोनाच्या सावटाखाली मार्चमध्ये निवडणूक होण्याची शक्यता असल्याचे दिसून येत आहे.
राजुरा बाजारसह अमडापूर, वडाळा, काटी, गाडेगाव, हातुर्णा व वघाळ या गावांतील निवडणूक प्रस्तावित आहे. सर्वच पक्षांनी राखीव जागेसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. तालुक्यातील राजकीय परिस्थिती पाहता, सर्वच पक्ष स्वतंत्र लढण्याच्या तयारीत दिसत आहेत. आरक्षण जाहीर झाले तेव्हापासून सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला व मतदारांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली आहे. काही पक्षांच्या नेत्यांनी बैठकींना सुरुवात केली आहे. देशामध्ये कोरोनाचे संकट आल्यामुळे निवडणुका लांबणीवर ढकलण्यात आल्या आहेत. परंतु, मागील काही दिवसांपासून कोरोनाग्रस्तांची संख्या कमी येत असल्याने सर्व राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.
युवा वर्ग राजकारणात
ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात युवा वर्ग रिंगणात राहण्याची शक्यता आहे. निवडणूक तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. असे असले तरी सर्वच पक्षांकडून बैठकांना सुरुवात झाली असून, काहींनी तर मतदारांशी भेटीगाठीसुद्धा सुरू केल्या आहेत. सरपंचपदासाठीची आरक्षण जाहीर झालेले नाही. त्यामुळे यावेळी सरपंचपदासाठी कोणत्या प्रवर्गाचे आरक्षण जाहीर होईल, हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
------