इर्विन रुग्णालयात वृद्धाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:16 IST2021-03-01T04:16:04+5:302021-03-01T04:16:04+5:30
अमरावती : एका वृद्धाचा जिल्हा सामान्य रुग्णालयात शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. राजू तुळशीराम निमकर ( ६०,रा. रुक्मिणीनगर) असे मृताचे ...

इर्विन रुग्णालयात वृद्धाचा मृत्यू
अमरावती : एका वृद्धाचा जिल्हा सामान्य रुग्णालयात शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. राजू तुळशीराम निमकर ( ६०,रा. रुक्मिणीनगर) असे मृताचे नाव आहे. त्यांच्या डोक्याला जखम झाली होती. याप्रकरणी शनिवारी फ्रेजरपुरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
------------------------------------------
गळफास घेऊन इसमाची आत्महत्या
अमरावती : गळफास घेऊन इसमाचे आत्महत्या केल्याची घटना नवाथे येथे शुक्रवारी घडली. शशिकांत भास्करराव गव्हाणे (४२, रा. नवाथे) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
----------------------------------------
दुचाकी लंपास
अमरावती : फ्रेजरपुरा ठाणे हद्दीतील संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलच्या गेटसमोरून ३० हजार रुपयांची एमएच२७-बीएम ५४९७ क्रमांकाची दुचाकी शुक्रवारी चोरीला गेली. ऋषभ अशोक वैद्य (२४, रा. सावनेर, नांदगाव खंडेश्वर) यांनी फ्रेजरपुरा ठाण्यात तक्रार नोंदविली.