एकझिरावासी पितात दूषित पाणी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:29 IST2020-12-12T04:29:47+5:302020-12-12T04:29:47+5:30
फोटो पी १० एकझिरा फोल्डर कायमस्वरुपी उपाययोजनेची मागणी : चुरणी : चिखलदरा तालुक्यातील एकझिरा या गावाला दरवर्षी पाणीटंचाईचा सामना ...

एकझिरावासी पितात दूषित पाणी !
फोटो पी १० एकझिरा फोल्डर
कायमस्वरुपी उपाययोजनेची मागणी :
चुरणी : चिखलदरा तालुक्यातील एकझिरा या गावाला दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. सद्यस्थितीत गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या बोअरवेलमधून अगदी नसल्यासारखेच व गावालगतच्या विहिरीवरून दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळे कोणत्याही क्षणी साथीच्या आजाराची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
चिखलदरा तालुक्यातील एकझिरा हे ७६५ लोकवस्तीचे गाव आहे. येथे जानेवारी महिन्यातच पाणीटंचाई जाणवालयला लागते. त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. येथील पाणीटंचाईवर लाखो रुपये खर्च दरवर्षी खर्च केला जातो. परंतू शासनाने येथे अद्यापही कायमस्वरुपी उपाययोजना केलेली नाही. गावाजवळ नाल्यात विहीर आहे. त्या विहिरीतील पाण्यात कधीच ब्लिचिंग पावडर टाकले जात नाही. ग्रामसचिव नेहमी गैरहजर असतात. २०० फूट खोल बोअरवेल आहे. हॅन्डपंप आहे. पण पाण्याचा थेंब नाही. ग्रामस्थांना रात्री तीन वाजतापासून पाण्यासाठी भटकंती करावी लागते. महिलांचा अर्धा वेळ पाणी भरण्यातच जातो. याकडे ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसचिवांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
कोट
पिण्याच्या पाण्यासाठी रात्रंदिवस भटकंती करावी लागते. ग्रामसचिव डोळ्यानेही दिसत नाहीत. कायमस्वरुपी उपाययोजना हव्यात.
- वंदना मेश्राम,
बचतगट अध्यक्ष एकझिरा
------------
एकझिरा गावातील पाणीटंचाईची पाहणी केली. पाणीपुवठा विभागाच्या वरिष्ठांशी बोललो. प्रस्ताव आल्याबरोबर जानेवारीत बोअर करून देण्याची ग्वाही त्यांचेकडून मिळाली.
- केवलराम काळे,
माजी आमदार
कोट ३
गावातील जुन्या विहिरीतून एकझिरावासीयांना पाणीपुरवठा केला जात आहे. विहिरीत ब्लिचिंग टाकण्यात आले आहे. त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे.
------- पाचघरे,
ग्रामसेवक, ग्रामपंचायत सोनापूर