शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

आठ वर्षांत वनविभागातील ८२२ अधिकारी, कर्मचा-यांचा मृत्यू, कर्तव्यावरील मृत्यू दहा टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 18:32 IST

- अनिल कडू परतवाडा ( अमरावती ) - राज्य वनविभागाच्या वार्षिक प्रशासकीय अहवालानुसार २००९ ते २०१८ या आठ वर्षांच्या ...

- अनिल कडू परतवाडा (अमरावती) - राज्य वनविभागाच्या वार्षिक प्रशासकीय अहवालानुसार २००९ ते २०१८ या आठ वर्षांच्या कालावधीत वनविभागातील ८२२ वनअधिकारी व कर्मचा-यांच्या अकाली, अपघाती व कर्तव्यादरम्यान मृत्युमुखी पडले. ही संख्या एकूण पदांच्या १० टक्के आहे. गडचिरोली, अमरावती जिल्ह्यातील दुर्गम भागातील कर्मचा-यांची संख्या यात अधिक आहे. वार्षिक प्रशासनिक अहवालानुसार, आठ वर्षात ४ हजार ६२८ वन अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. १५७ लोक नोकरी सोडून गेले असून, ५५४ अधिकारी-कर्मचारी निलंबित तर ५८ बडतर्फ झाले आहेत.वनसंरक्षणाचे मूलभूत कर्तव्यातील क्षेत्रीय अधिकारी  व कर्मचा-यांचे वेतन, अपु-या सुविधा, कामाचे नियोजन व व्यवस्थापनाचा अभाव, साप्ताहिक रजा  व वैद्यकीय सवलती न देणे, आघाडीवर लढणा-या घटकाची उपेक्षा या आणि अन्य कारणांमुळे कर्मचारी-अधिका-यांच्या एकूण संख्येपैकी १० टक्के लोक मृत्यूला कवटाळत असल्याचे वनविभागातील कर्मचारी व अधिकाºयांच्या संघटनांनी स्पष्ट केले.वनविभागातील कर्मचारी व अधिका-यांच्या व्हॉट्अ‍ॅप ग्रुपवर हा वार्षिक अहवाल शेअर केला जात आहे. यातील आकडेवारी बघून चिंतेसह हळहळ व्यक्त होते आहे. वनविभागातील आठ वर्षातील ८२२ वनअधिकारी व कर्मचा-यांच्या मृत्यूबाबत केंद्र व राज्याचा मानवाधिकार आयोग, मागासवर्गीय व अल्पसंख्याक आयोग, महिला आयोग यांनी दखल घेतलेली नाही. मृत्यूमूखी पडलेल्या या कर्मचा-यांच्या कुटुंबीयांना तीन ते सहा महिन्यांत योग्य तो लाभही वनविभागाकडून तात्काळ दिलेला नाही. वनविभागातील उच्चपदस्थांनीही या कुटुंबांचे सांंत्वन केले नाही, असे कर्मचारी-अधिकारी यांच्या संघटनेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.वनअधिकारी व कर्मचा-यांच्या मृत्यूची आकडेवारी अशी - वर्ष        सर्कल        मृत्यू२०१७-१८    अमरावती        १२        गडचिरोली        १५        नागपूर        १२२०१६-१७    अमरावती        ०९        गडचिरोली        २३        चंद्रपूर        ०९                नागपूर        १२        यवतमाळ        ०५२०१५-१६    अमरावती        ०९        यवतमाळ        १५            नागपूर        १०        चंद्रपूर        ०३                गडचिरोली        १५२०१४-१५    अमरावती        २१        यवतमाळ        ०८            नागपूर        १६        चंद्रपूर        ००                गडचिरोली        २२२०१२-१३    अमरावती        ०४        यवतमाळ        ०८            नागपूर        १०        चंद्रपूर        ०३                गडचिरोली        १९२०१०-११    अमरावती        ०५        यवतमाळ        ०४            नागपूर        ११        चंद्रपूर        ०३                गडचिरोली        २३२००९-१०    अमरावती        ०४        यवतमाळ        ०६            नागपूर        १०        उत्तर चंद्रपूर        ०६                दक्षिण चंद्रपूर    ११

टॅग्स :forest departmentवनविभागAmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्र