आठ दुकाने, घरे जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:00 IST2020-03-03T05:00:00+5:302020-03-03T05:00:42+5:30
सोमवारी सकाळी सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंता व पालिका मुख्याधिकारी सुमेध अलोणे यांच्या उपस्थितीत २० पालिका कर्मचारी व ४० पोलिसांच्या संरक्षणात अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात झाली. ही मोहीम सायंकाळी ६ वाजेपर्यंत अविरतपणे सुरू होती. पहिल्या दिवशी पालिकेसमोरील दिलीप किराणा, शंकर सेवाणी, धनू नानवाणी यांच्या दुकानासह बोहरा स्मशानभूमीच्या बाजूच्या घरावर जेसीबी चालविली.

आठ दुकाने, घरे जमीनदोस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : अतिक्रमण निर्मूलन मोहिमेंतर्गत पहिल्या दिवशी शहरातील आठ दुकाने व घरे जमीनदोस्त करण्यात आली. २० अतिक्रमणधारकांना २४ तासांची नोटीस जारी करण्यात आली. मंगळवार व बुधवारी ही कारवाई चालेल.
सोमवारी सकाळी सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंता व पालिका मुख्याधिकारी सुमेध अलोणे यांच्या उपस्थितीत २० पालिका कर्मचारी व ४० पोलिसांच्या संरक्षणात अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात झाली. ही मोहीम सायंकाळी ६ वाजेपर्यंत अविरतपणे सुरू होती. पहिल्या दिवशी पालिकेसमोरील दिलीप किराणा, शंकर सेवाणी, धनू नानवाणी यांच्या दुकानासह बोहरा स्मशानभूमीच्या बाजूच्या घरावर जेसीबी चालविली. या अतिक्रमणधारकांनी पालिकेच्या हद्दीत सहा फूट अतिक्रमण केले होते. त्यांना यापूर्वी नोटिसा बजावल्या होत्या. आयपीएस अधिकारी कुमार चिंता, सहायक पोलीस निरीक्षक मिलिंद सरकटे, मंगरूळ दस्तगीरचे ठाणेदार दिलीप वळवी, पालिकेचे बांधकाम विभागाचे शाखा अभियंता शैलेंद्र मेटे, प्रदीप सहारे, नगररचना विभागाचे अभियंता रवी हिरुळकर यांनी ही कारवाई केली.
मोहीम थांबवा काँग्रेसची मागणी
धामणगाव शहर तालुक्याचे केंद्रबिंदू आहे. ग्रामीण भागातील अनेक ग्रामस्थ दररोज शहरात येतात. दुकान लावून दोन पैसे कमावतात. त्यांच्या कुटुंबाचा गाडा पान टपरीसारख्या लघु व्यवसायावर चालतो. त्यामुळे अतिक्रमण हटवू नये, अशी मागणी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष आशिष शिंदे यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.
तीन दिवस चालणार मोहीम
धामणगाव शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी तीन दिवस अतिक्रमण हटाव मोहीम सुरू राहणार आहे. यात कुणीही राजकारण करू नये. जे अतिक्रमण धारक सहकार्य करणार नाहीत, त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे निर्देश सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी सोमवारी दिले.
आम्हाला न्याय द्या
अनेक वर्षांपासून आम्हीरस्त्याच्या बाजूला बसून लघु व्यवसाय करीत आहोत. आमच्यामुळे कुणालाही त्रास नाही अतिक्रमण हटविले तर आमचे कुटुंब उघड्यावर येणार आहे त्यामुळे आम्हाला न्याय द्यावा, अशी विनंती शहरातील काही अतिक्रमणधारकांनी मुख्याधिकाऱ्यांकडे करण्यात आली.