अचलपूर तालुक्यात एकाच दिवशी आठ कोरोना मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:11 IST2021-05-28T04:11:16+5:302021-05-28T04:11:16+5:30

पान २ ची लिड परतवाडा : सावधान! अचलपूर तालुक्यात जीवघेणा कोरोना अद्यापही उग्र रूप धारण करून आहे. अचलपूर ...

Eight corona died on the same day in Achalpur taluka | अचलपूर तालुक्यात एकाच दिवशी आठ कोरोना मृत्यू

अचलपूर तालुक्यात एकाच दिवशी आठ कोरोना मृत्यू

पान २ ची लिड

परतवाडा : सावधान! अचलपूर तालुक्यात जीवघेणा कोरोना अद्यापही उग्र रूप धारण करून आहे. अचलपूर तालुक्यातील आठ कोरोना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान वेगवेगळ्या रुग्णालयात गुरुवार २७ मे रोजी मृत्यू झाला आहे.

यात जिल्हा कोविड रुग्णालयात उपचारादरम्यान अचलपूर येथील ७० वर्षीय पुरुष, ५३ वर्षीय महिला, ४९ वर्षीय पुरुष, तर परतवाडा येथील ६० वर्षीय महिला, शिंदी येथील ४१ वर्षे पुरुष हे रुग्ण दगावले आहेत. कांडली येथील ६६ वर्षीय पुरुष गजानन महाराज कोविड रूग्णालयात, परतवाडा येथील ७५ वर्षीय पुरुष उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे, तर कांडली येथील ४४ वर्षीय पुरुष गुलाब बाग कोविड रुग्णालयात दगावले आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अचलपूर तालुक्यात उपचारादरम्यान दगावलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या लक्षवेधक आहे. या दुसऱ्या लाटेत अचलपूर, परतवाडा शहरासह तालुक्यात ६० चे वर रुग्ण दगावले. यातील काहींचीच नोंद स्थानिक प्रशासकीय यंत्रणेकडे आहे. अनेक मृत्यू अजूनही रेकॉर्डला आलेले नाहीत. २७ मे रोजी दगावलेल्या आठ कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक ठरली आहे.

Web Title: Eight corona died on the same day in Achalpur taluka